newsक्राईम बिटमहाराष्ट्र

महापालिका नगररचना विभागा प्रभारी अभियंता, लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

Share Now
औरंगाबाद महापालिकेतील नगररचना विभागातील प्रभारी अभियंता तथा गुंठेवारी संजय चामले कक्षप्रमुख संजय लक्ष्मण चामले याला तीन लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले.
तक्रारदार बिल्डरकडे ले-आऊट मंजूर करून देण्यासाठी सहा लाख रुपयांची मागणी केली होती. त्यातील पहिल्या हप्त्यापोटी तीन लाख स्वीकारताना पकडण्यात आल्याची माहिती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली. नागरिकांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या अधिकाऱ्याला करण्यासाठी
महापालिकेतील भ्रष्टाचाराचे कुरण असलेल्या नगररचना विभागात प्रभारी अभियंता म्हणून संजय चामले हा दिवसांपासून गुंठेवारी विभागाचा कक्षप्रमुखही करण्यात आले होते. त्याच्याविषयी नागरिकांच्या प्रचंड तक्रारी होत्या. मात्र राजकीय वरदहस्तामुळे त्याच्याविरोधात कारवाई करण्यात येत नव्हती.
एका बिल्डरकडून एका कामासाठी १० लाख रुपये घेतले होते. त्यानंतरही ले-आऊटच्या तीन फाईल मंजुरीसाठी ६ लाख रुपयांची मागणी केली होती. पहिल्या हप्त्यापोटी 3 लाख रुपये देण्याचे ठरले होते. मात्र, तक्रारदारास पैसे देण्याची इच्छा नसल्यामुळे एसीबीचे अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्याकडे तक्रार दाखल केली.
एका बिल्डरकडून एका कामासाठी १० लाख रुपये घेतले होते. त्यानंतरही ले-आऊटच्या तीन फाईल मंजुरीसाठी ६ लाख रुपयांची मागणी केली होती. पहिल्या हप्त्यापोटी 3 लाख रुपये देण्याचे ठरले होते. मात्र, तक्रारदारास पैसे देण्याची इच्छा नसल्यामुळे एसीबीचे अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्याकडे तक्रार दाखल केली.
नगररचना विभागात ले-आऊटसाठी प्रस्ताव दाखल करण्यात येत झाल्यानंतर त्याच्या मंजुरीसाठी २ लाख रुपये देण्याचा होती. अलिखित नियमच होता. प्रस्ताव दाखल झाल्यानंतर टोकन म्हणून १ लाख रुपये द्यावे लागत होते. उर्वरित १ घेताना लाख रुपये ले-आऊट मंजूर केल्यानंतर द्यावे लागत होते, पकडल्याच रंगेहाथ पकडले.
तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सातारा परिसरातील चामले याच्या घरीच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. त्यानुसार तक्रारदाराकडून तीन लाख रुपयांची रोख रक्कम स्वीकारताना चामले यास पथकाने रंगेहात पकडले. ही कामगिरी अधीक्षक डॉ. खाडे यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक रूपचंद वाघमारे यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *