देश

पाच राज्यातील निवडणुकीच्या तारखा जाहीर

Share Now

गेल्या दोन महिन्यापासून निवडणुका होणार की नाही यावर चर्चा सुरू होती आज या सर्व चर्चेला पूर्णविराम लागला आहे. आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणूक जाहीर होणार आहे.
पाच राज्यांतील निवडणुकाचं ७ टप्प्यांत मतदान होणार , १० मार्चला मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमधील निवडणुकांच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली.

कोरोनाची तिसरी लाट आणि ओमायक्रॉनची भिती या पार्श्वभूमीवर या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली गेली होती. मात्र, निवडणूक आयोगाने या निवडणुका होणार असल्याचं स्पष्ट केल्यानंतर आज त्यासंदर्भातला कार्यक्रम आयोगाकडून जाहीर करण्यात येत आहे.

पहिला टप्पा – १० फेब्रुवारी

सर्व राज्यांमधल्या निवडणुका एकूण ७ टप्प्यांमध्ये घेतल्या जाणार . उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यासाठी १४ जानेवारीला परिपत्रक काढलं जाईल.

उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख २१ जानेवारी आणि अर्ज मागे घेण्याची तारीख २७ जानेवारी असेल. तर मतदान १० फेब्रुवारीला होईल.

दुसरा टप्पा

या टप्प्यात ४ राज्यांमधे निवडणुका होतील. उत्तर प्रदेशचा दुसरा टप्पा, उत्तराखंड, पंजाब आणि गोव्याचा पहिला टप्पा. २१ जानेवारीला नोटिफिकेशन, अर्ज भरण्याची तारीख २८ जानेवारी, मागे घेण्याची मुदत ३१ जानेवारी तर मतदानाची तारीख १४ फेब्रुवारी असेल.

तिसरा टप्पा

या टप्प्यात फक्त उत्तर प्रदेशचा तिसरा टप्पा होईल. नोटिफिकेशन २५ जानेवारीला निघेल. अर्ज भरण्याची तारीख १ फेब्रुवारी, मागे घेण्याची मुदत ४ फेब्रुवारी तर मतदानाची तारीख २० फेब्रुवारी असेल.

चौथा टप्पा

या टप्प्यात उत्तर प्रदेशच्या निवडणुका होतील. नोटिफिकेशन तारीख २७ जानेवारी, अर्ज भरण्याची तारीख ३ जानेवारी, मागे घेण्याची तारीख ७ फेब्रुवारी आणि मतदानाची तारीख २३ फेब्रुवारी असेल.

पाचवा टप्पा

यात उत्तर प्रदेशचा पाचवा आणि मणिपूरचा पहिला टप्पा यासाठी मतदान होईल. नोटिफिकेशन १ फेब्रुवारीला निघेल. अर्ज भरण्याची तारीख ८ फेब्रुवारी असेल. मागे घेण्याची तारीख ११ फेब्रुवारी तर मतदानाची तारीख २७ फेब्रुवारी असेल.

सहावा टप्पा

या टप्प्यात उत्तर प्रदेश सहावा आणि मणिपूर दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुका होतील. यात नोटिफिकेशन ४ फेब्रुवारी, अर्ज भरण्याची तारीख ११ फेब्रुवारी, मागे घेण्याची तारीख १६ फेब्रुवारी तर मतदानाची तारीख ३ मार्च असेल.

सातवा टप्पा

उत्तर प्रदेशच्या सातव्या टप्प्यासाठी नोटिफिकेशन १० फेब्रुवारीला निघेल. अर्ज भरण्याची तारीख १७ फेब्रुवारी, अर्ज मागे घेण्याची तारीख २१ फेब्रुवारी आणि मतदानाची तारीख ७ मार्च असेल.

मतमोजणीची तारीख १० मार्च असेल.

राज्यनिहाय निवडणूक कार्यक्रम

उत्तर प्रदेश – ७ टप्प्यांत मतदान होणार आहे .
पहिला टप्पा – १० फेब्रुवारी
दुसरा टप्पा – १४ फेब्रुवारी
तिसरा टप्पा – २० फेब्रुवारी
चौथा टप्पा – २३ फेब्रुवारी
पाचवा टप्पा – २७ फेब्रुवारी
सहावा टप्पा – ३ मार्च
सातवा टप्पा – ८ मार्च

मतमोजणी – १० मार्च

पंजाब, गोवा, उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे
अर्ज भरण्याची तारीख – २८ जानेवारी
अर्ज मागे घेण्याची तारीख – ३१ जानेवारी
मतदानाची तारीख – १४ फेब्रुवारी
मतमोजणी – १० मार्च

मणिपूरमध्ये दोन टप्प्यांत मतदान होणार आहे
पहिला टप्पा – २७ फेब्रुवारी
दुसरा टप्पा – ३ मार्च
मतमोजणी – १० मार्च

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *