महाराष्ट्रराजकारण

एकनाथ शिंदेचा शिवसेनेला शेवटचा ‘जय महाराष्ट्र’?

Share Now

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे सोमवार पासून ११ आमदार संपर्काच्या बाहेर आहे, ते सुरत येथे आहेत असे समजून आले आता. मात्र आता शिवसेने नंतर . राज्याचे राजकारण दिल्ली, गुजरात आणि सुरत येथून फिरवले जात आहे का ? असा प्रश्न चर्चेचा ठरत आहे. अशात शिवसेना नेते एकनाथ शिंदे आज संध्याकाळी मंत्री पदाचा राजीनामा देणार अशी माहित सूत्रांद्वारे समोर येत आहे. दरम्यान त्यांच्या सोबत गेलेल्या ११ आमदारांचा काय असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.

जांभूळ लागवडीसाठी हा आहे योग्य हंगाम, शेतकरी करू शकतात लाखोंची कमाई

तसेच, कॉग्रेसचे ५ आमदार देखील संपर्काच्या बाहेर गेले आहे. त्यांची नवे अद्याप स्पष्ट झाले नाही. काल लागलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्य निकाला नंतर शिवसेना आणि काँग्रेसचे मत फुटल्याचे पाहायला मिळाले त्यामुळे शिवसेना आणि कॉग्रेसचे काही आमदार नाराज होते, आता सूत्रांने दिलेल्या माहिती नुसार कॉग्रेसचे देखील ५ आमदार संपर्काच्या बाहेर गेले आहे असे समजते

एकनाथ शिंदेंवर शिवसेने कडून बंडखोरी मुळे ‘ही’ कारवाई, दिलेली मोठी जबाबदारी घेतली काढून

या संपूर्ण घडामोडींमुळे राज्यसरकार पडेल असा सूर देखील विरोधक लावत आहे. दरम्यन शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यात वादंग देखील पाहायला मीट आहे. त्यांचा विधीमंडळ गटनेते पद देखील कडून घेण्यात याले आहे. दरम्यान जर ५ कॉग्रेस आणि ११ शिवसेनेच्या आमदारांनी भाजपला पाठिंबा दिली तर भाजप सत्ता स्थापन करू शकेल? अश्या चर्चा देखील सुरु झाल्या आहे. राजकीय हायहोल्टेज ड्रम काळ पासून राज्यात पाहायला मिळत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *