एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रिपदावर दावा कायम, उदय सामंत यांचे स्पष्टिकरण
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद म्हणजे मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला असा अर्थ निघालेला नाही, असे स्पष्टीकरण शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी दिलं आहे. सामंत यांचा दावा आहे की शिंदे यांनी फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे. यामुळे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत शिंदे अजूनही ठाम आहेत, असा संदेश सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिला.
महाराष्ट्र मंत्रिमंडळात भाजपचा नवीन युवा फॉर्म्युला, अनेक ज्येष्ठांना बसणार फटका
दरम्यान, महाराष्ट्रातील मुख्यमंत्रिपदाच्या दाव्याबाबत चर्चा रंगली आहे. विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर महायुतीमध्ये या बाबत खलबत सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, मोदी आणि शाह जे निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल. त्यांच्या या वक्तव्यामुळे मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारीवर चर्चा होऊ लागली होती. यावरून सामंत यांनी स्पष्ट केलं की, शिंदे गटाच्या निर्णयासाठी पंतप्रधानांचा आदर दाखवणे हा एक राजकारणातील सुसंस्कृतपणा आहे, परंतु याचा अर्थ शिंदे मुख्यमंत्रिपदाची शर्यत सोडत नाहीत.
महायुतीची पत्रकार परिषद | मुंबई |
Latest: