राजकारण

एकनाथ शिंदे केंद्रात जाणार नाहीत, “या” नेत्याचा मोठा खुलासा

Share Now

एकनाथ शिंदे केंद्रात जाणार नाहीत, “या” नेत्याचा मोठा खुलासा  महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या विजयावरून आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडींबाबत शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. महायुतीने १३२ जागा जिंकल्या असून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्याचवेळी मुख्यमंत्रीपदावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा सुरु आहे, आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे केंद्रात जाण्याच्या चर्चेत आहेत.

विद्यार्थ्याने शिक्षणासाठी केली चोरी; घटनेतून समाजाला विचार करण्याची गरज

श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार नाही?
शिरसाट यांनी स्पष्टपणे सांगितले की, श्रीकांत शिंदे यांना राज्यातील राजकारणात रस नाही. “ते उपमुख्यमंत्री होणार नाहीत,” असे ते म्हणाले. याशिवाय, संजय शिरसाट यांनी मंत्रीपदासाठी कोणतीही लॉबिंग करत नसल्याचंही सांगितले. त्यांनी हेट दिले की, त्यांनी केवळ सदिच्छा भेट घेतली होती आणि त्यावरून कोणत्याही राजकीय चर्चेला वाव दिला नाही.

दहावी-बारावीच्या परीक्षा वेळापत्रकात मोठा बदल विद्यार्थ्यांना दिला “धक्का” !

मुख्यमंत्रीपदावर कोण?
मुख्यमंत्रीपदावर कोण होणार, याबाबत संजय शिरसाट यांनी सांगितले की, “अद्याप दिल्लीतील नेत्यांकडून कुणालाही फोन आलेला नाही.” त्याचप्रमाणे त्यांनी स्पष्ट केले की, शिंदे साहेबांचा निर्णय काही केल्यावरच ठरवला जाईल, आणि तो त्यांच्याच हिशोबाने योग्य वेळेस घेतला जाईल. शिरसाट यांच्या विधानांमुळे महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर आणखी एक वळण घेणार का, हे येणाऱ्या दिवसांत स्पष्ट होईल.

एकनाथ शिंदे केंद्रात जाणार नाहीत?
एकनाथ शिंदे यांच्या केंद्रात जाण्याच्या चर्चांवर शिरसाट यांनी शंभर टक्के नकार दिला. “शिंदे साहेबांना महाराष्ट्राच्या भल्यासाठी काम करायचं आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की शिंदे यांना राज्यातील जनतेचा विकास करायचा आहे आणि ते केंद्रात जाण्याच्या विचारात नाहीत. “तुम्ही पाहिले आहे, ते योग्य वेळी योग्य निर्णय घेतात,” असे सांगत शिरसाट यांनी विरोधकांना अप्रत्यक्षपणे इशारा दिला की शिंदे यांचे निर्णय नेहमीच सूज्ञ असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *