महाराष्ट्रराजकारण

अपघातग्रस्त वारकऱ्यांच्या मदतीला धावून आले ‘एकनाथ’

Share Now

आषाढी वारीसाठी निघालेल्या वारकाऱ्यांच्या दिंडीला अपघात झाला . या आपघातात १६ वारकरी गंभीर जखमी झाले. मिरज-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गवरील केरेवाडी फाट्याजवळ हा अपघात झाला असून, वारकऱ्यांच्या दिंडीत पिकअप जीप घुसल्याने हा अपघात घडला. यामध्ये जखमी झालेल्या वारकऱ्यांना मिरज शासकीय आणि कवठेमहांकाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याबद्दल मुखयमंत्री एकनाथ शिंदे यांना समजताच त्यांनी वारकर्यांना फोन करून चांगला उपचार मिळावा आणि उपचारासाठी लागणार सर्व खर्च मी करेल असे ते म्हणाले, आपल्याला वारकऱ्यांचा जीव महत्वाचा आहे, काही लागलं तर मला कालवा असे ते म्हणाले.

नूपुर शर्मा यांना माजी न्यायमूर्तीचे समर्थन, म्हणाले…

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी येथील वारकरऱ्यांची पायी दिंडी ही पंढरपूरला निघाली होती. कवठेमहांकाळ तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील केरेवाडी येथे ही वारी पोहोचली असता, मागून आलेल्या भरधाव पीकअप जीप गाडीने आधी दिंडीत असणाऱ्या छोटा हत्ती या टेम्पोला जोरदार धडक दिली. त्यानंतर गाडी पायी निघाललेल्या दिंडीमध्ये घुसून पलटी झाली.

पीक व्यवस्थापन: तणांमुळे मका पिकाचा नाश होऊ देऊ नका, त्यावर नियंत्रण ठेवण्याचा योग्य मार्ग

या अपघातात १६ वारकरी जखमी झाले, या सर्वांना तातडीने मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पिकअप जीपच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. त्यानंतर ड्रायव्हर पळून गेला आहे. या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत. मात्र, या अपघातात सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *