‘एकनाथ है तो सेफ है’ शिंदे गटाच्या महिला नेत्याचं खळबळजनक वक्तव्य
‘एकनाथ है तो सेफ है’ शिंदे गटाच्या महिला नेत्याचं खळबळजनक वक्तव्य
शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांचे वक्तव्य: “एकनाथ है तो सेफ है”, संजय राऊतावर केली टीका
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीकडून वेगवेगळ्या घोषणा देण्यात आल्या, त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘एक है, तो सेफ है’ यांचा समावेश होता. याच पंक्तीला अनुसरून शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने, विधान परिषद आमदार मनिषा कायंदे यांनी ‘एकनाथ है तो सेफ है’ अशी घोषणा केली आहे.
भाजपच्या प्रस्तावांना शिंदेंचा नकार, नवीन मागणी घेऊन आले समोर
कायंदे यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक करत म्हटले की, “एकनाथ शिंदे यांनी योग्यप्रकारे राज्याचा कारभार केला आहे आणि हिंदुत्वाच्या विचारांनाही पुन्हा शिवसेनेमध्ये जागवले आहे. लाडक्या बहिणींच्या भावनांना ओळखून आम्ही हे ‘एकनाथ है तो सेफ है’ असे म्हटले आहे.”
मुख्यमंत्रिपदाबाबतच्या चर्चेबद्दल कायंदे म्हणाल्या, “भाजप आणि शिंदे गटामध्ये काय चर्चा झाली ते मला माहिती नाही, पण कार्यकर्त्यांची भावना महत्त्वाची आहे, आणि महायुतीमध्ये कोणताही तणाव निर्माण होणार नाही.”
महायुतीची पत्रकार परिषद | मुंबई |
तसेच, शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ईव्हीएमवर शंका व्यक्त केली आणि बॅलेट पेपरवर निवडणूक होण्याची मागणी केली होती. यावर प्रतिक्रिया देताना कायंदे म्हणाल्या, “राऊतांना बॅलेट पेपरची गरज काय आहे? ईव्हीएम काँग्रेसच्या काळात आलं, त्यावरच कोर्टाने फटकारा दिला आहे. संजय राऊत यांना तांत्रिक ज्ञानाचा कमी आहे का?”