पुण्यात आठ वर्षांच्या मुलाचा बैलाच्या दोरीमुळे दुर्दैवी मृत्यू, कुटुंबावर शोककळा
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील फुलगाव येथील आठ वर्षांच्या शौर्य शैलेश वागस्कर या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. शौर्य आपल्या अंगणात खेळत असताना बैलाला बांधलेली दोरी हातात घेतली, आणि त्याच वेळी बैल पळत सुटला. या दोरीमुळे शौर्य चुकून बैलाच्या मागे ओढला गेला, ज्यामुळे त्याला गंभीर जखमा झाल्या आणि त्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी सहा वाजता घडली.
महाराष्ट्र मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपाचे धक्कादायक निर्णय?
घटनेच्या वेळी शौर्यचे पालक घरात होते. आवाज ऐकून ते बाहेर आले आणि त्यांनी शौर्यला गंभीर जखमी अवस्थेत पाहिले. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. शौर्य फुलगाव येथील शाळेतील दुसऱ्या इयत्तेत शिकत होता आणि त्याचे घरात एकुलते एक मुलगा होता. या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.