ईडीकडून नवाब मलिक यांची आठ तास चौकशी आणि अटक..
आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना अटक करण्यात आली मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आल्याचे समोर आहेत आली आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी नवाब मलिक यांच्या घरी आज सकाळीच धाड टाकून चौकशीला सुरुवात केली. मलिक यांना सात वाजण्याच्या सुमारास ईडीच्या अधिकाऱ्यांसह ईडी कार्यलयात दाखल झाले होते.
नवाब मलिक यांच्या अटकेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि महा विकास आघाडीला हा मोठा धक्का बसला आहे. अनिल देशमुख यांच्या नंतर मंत्रीपदावर असताना अटक झालेले नवाब मलिक हे दुसरेच मंत्री आहे.
नवाब मलिक यांना तपासणीसाठी जे जे रुग्णालयात नेण्यात येणार आहे. तर तपासणीनंतर कोर्टात घेऊन जाण्याची शक्यता आहे. दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणांमध्ये यांचा सहभाग असल्याची पुरावे सापडले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुंबईत काही दिवसांपूर्वी छापेमारी सुरू होती ईडीच्या रडारवर दाऊद इब्राहिमची मालमत्ता आणि संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेते मंडळी होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ही कारवाई सुरू केली. या छापेमारी नंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात याची चर्चा आधीपासूनच सुरू होती.