क्राईम बिट

ईडीने ज्ञानराधा मल्टीस्टेट सोसायटीच्या ३३३ कोटी रुपयांची मालमत्ता केली जप्त; मनी लॉड्रिंग प्रकरणी कारवाई

ईडीने ज्ञानराधा मल्टीस्टेट सोसायटीच्या ३३३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीत, अमंलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीवर आर्थिक घोटाळ्याचा ठपका ठेवत ईडीने ३३३ कोटी ८२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

फडणवीसांचा दावा: मोदींच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हा होईल नंबर 1, कर्जमाफीसाठी सरकार ठरवणार मोठा निर्णय

मनी लॉड्रिग आणि अपहाराचे आरोप
सुरेश कुटे यांच्या नेतृत्वाखालील ज्ञानराधा सोसायटीने २३१८ कोटी रुपयांचा अपहार केला, असे तपासात उघडकीस आले आहे. हे पैसे कर्जाच्या स्वरूपात इतर कंपन्यांमध्ये वळवले गेले आणि नंतर रोखीने काढून वैयक्तिक मालमत्तांची खरेदी करण्यात आली. या प्रकरणात मनी लॉड्रिगचा धागा सापडल्याने ईडीने तपास सुरू केला आहे.

ट्रेनच्या स्थितीपासून तिकीट बुकिंगपर्यंत, रेल्वेचे हे सुपर ॲप सर्वकाही करेल

गुन्हे आणि मालमत्ता जप्ती
ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या ५० शाखा आहेत, ज्या महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये काम करतात. या सोसायटीमध्ये पावणेचार लाख ठेवीदारांची अडकलेली रक्कम तीन हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. ठेवीदारांच्या फसवणूक प्रकरणी जालना आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हे दाखल आहेत.

सुरेश कुटे आणि यशवंत कुलकर्णी अटक
ज्ञानराधा सोसायटीचे अध्यक्ष सुरेश कुटे आणि उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी सध्या कारागृहात आहेत. ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये कुटे डेअरी, कुटे सन्स फ्रेश डेअरी यांचे जमिनी, इमारती, प्रकल्प आणि मशिनरीचा समावेश आहे. ही मालमत्ता सातारा आणि अहिल्यानगर जिल्ह्यात आहे.

पूर्वीची जप्ती
यापूर्वी, १० ऑक्टोबर रोजी ईडीने ज्ञानराधा सोसायटीच्या १००२ कोटी ७९ लाख रुपयांच्या मालमत्तेवर कारवाई केली होती. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये मुंबई, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जालना येथील इमारती आणि भूखंडांचा समावेश आहे.

तपास सुरु
ज्ञानराधा मल्टीस्टेट सोसायटीच्या कारवायांमुळे ईडीने आणखी तपास सुरू केला आहे, ज्यात परदेशात पैसा गेल्याचा संशय देखील आहे.

Latest:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *