संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत याना ईडीकडून अटक
शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रवीण राऊत याना ईडीकडून अटक करण्यात आली आहे, जवळपास १ हजार ३४ कोटी पत्रचाल जमीन घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप प्रवीण राऊत यांच्यावर आहे, दरम्यान, गोरेगाव भूखंडाच्या विक्रीत एफएसआयमध्ये गैरव्यवहार केल्याच्या आरोपांखाली मनी लांड्रिंगचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना अटक झाली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांचे प्रवीण राऊत हे नातेवाईक असून . मागील काही दिवसांपासून ते ईडीच्या रडारवर होते. मंगळवारी प्रवीण यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणी ईडीनं छापेमारी केली होती. त्यानंतर ईडीनं त्यांना ताब्यात घेत चौकशीसाठी दक्षिण मुंबईतील कार्यालयात घेऊन गेले होते . ईडीच्या कार्यालयात प्रवीण राऊत यांची कसून चौकशी करण्यात आली. प्रवीण राऊत यांनी चौकशीला सहकार्य न केल्याने ईडीनं त्यांना अटक केली.