ईडीच्या कारवाईनंतर खा. संजय राऊत यांचं सूचक ट्विट
शिवसेना खा. संजय राऊत यांच ट्विट असेल किंवा प्रेस महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून कायम चर्चेत असल्याचे आपण बघतो.
मग ७२ तासाचे सरकार असेल किंवा काँग्रेस रा. काँग्रेस सोबत कॉमन मिनिमम् प्रोग्राम या तत्वावर उभं राहिलेलं महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार स्थापन होण्यात संजय राऊत यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे दिसून आले.
गेल्या काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांच्या पत्नी आणि त्याचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रवीण राऊत यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा सुरू होता. त्यात आता खा. संजय राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.
आज झालेल्या कारवाईवर संजय राऊत यांनी अश्या कारवाईला घाबरत नसून एक रुपयांची जरी बेनामी संपत्ती असली तर राजीनामा देऊन अशी प्रतिक्रिया दिली. त्यावर त्यांनी नेहमी प्रमाणे ट्विट देखील केलं असून त्यांच्या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
“मैं सागर से भी गहरा हु तुम कितने कंकड़ फेंकोगे, चुन चुन कर आगे बढूंगा मैं । तुम मुझको कब तक रोकोगे । अस ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.
जय महाराष्ट्र pic.twitter.com/CizDvVElnX
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 5, 2022