विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यामध्ये भुकंप; नागरिक भयभीत
विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यामध्ये भुकंप; नागरिक भयभीत
सकाळी ७.३० वाजता चंद्रपूर, गडचिरोली व यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के
चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात आज सकाळी ७.३० वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. या भूकंपामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून, काही इमारतींमध्ये हलचाल झाली. भूकंपाचा केंद्रबिंदू तेलंगणा राज्यातील मुलुगू या गावात होता, अशी माहिती मिळाली आहे. भूकंपाची तीव्रता रिष्टर स्केलवर ५.३ मोजली गेली आहे.
‘ब्रेन रॉट’ म्हणजे काय? जाणून घ्या तुमच्या फायद्याची गोष्ट.
तेलंगणा राज्यातील मुलुगू येथे भूकंपाचा धक्का सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी बसला. या भूकंपाचे सौम्य धक्के गडचिरोली जिल्ह्यातील कोरची, अहेरी, अल्लापल्ली, चामोर्शी आणि इतर काही भागात जाणवले. यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातही हलके धक्के जाणवले आहेत.
गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय दैने यांनी नागरिकांना सावधगिरीचा सूचना केली आहे. त्यांनी सांगितले की, भूकंपाच्या धक्क्यांनी घाबरून न जाता, इमारती बाहेर मोकळ्या जागेत सुरक्षित स्थानावर जावे आणि आवश्यक तेवढे दक्षता घ्यावी.
अजित पवारांकडून शिंदेंच्या गावी जाण्यावर स्पष्टीकरण, बघा काय म्हणाले ?
भूकंपाच्या या सौम्य धक्क्यांमुळे नागपूर जिल्ह्याच्या काही भागातही हलकासा कंप जाणवला आहे. विदर्भातील तेलंगणा राज्याला लागून असलेल्या काही जिल्ह्यांमध्ये या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नागरिकांना भूकंपाच्या धक्क्यांबद्दल माहिती देत, अधिक तपास सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.