“ह्याच” अडचणीमुळे शरद पवारांनी आरक्षणाबाबत काहीच सुचवलं नसेल, बबनराव तायवडेंचा अंदाज
नागपूर: शरद पवारांकडे मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर काही तोडगा राहिला असता तर त्यांनी तो या आधीच सुचवला असता. मुळातच या प्रकरणात काही तांत्रिक आणि कायदेशीर अडचणी आहेत. त्यामुळेच पवारांनी आजवर काही सूचना केल्या नसाव्या, असं मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केले आहे. काल ओबीसी नेते म्हणून छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेत या प्रकरणात आपण मार्गदर्शन करावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर त्या मुद्द्याशी संबंधित प्रश्न विचारल्यावर तायवाडे यांनी हे उत्तर दिले आहे. ते नागपूर येथे बोलत होते.
अनंत अंबानींच्या लग्नात बॉम्बच्या धमकीवर मुंबई पोलिसांची सुरु कारवाई. एकाला केली अटक.
सर्व पक्षांच्या एकमताने अतिरिक्त दहा टक्के आरक्षणाला संमती
मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या बैठकीच्या मुद्द्यावरुन शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे काल सकाळी अचानक शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकयेथे दाखल झाले, मंत्री छगन भुजबळ यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे छगन भुजबळ अचानक शरद पवार याना भेटायला का आले, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही त्यामुळे या भेटीबाबत अनेकांची उत्सुकता वाढली आहे. या भेटीच्या चर्चेदरम्यान राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांनी वक्तव्य केले आहे. या भेटीबाबत बोलताना तायवाडे म्हणाले की, जे आंदोलन गेले काही दिवसापासून सुरू आहे
IAS पूजा खेडकर यांचे कुटुंबीय झाले बेपत्ता!, इनकम टैक्स कडून मागितलेला डेटा.
तोपर्यंत हा विषय निकाली निघू शकत नाही
या आंदोलनाच्या मागणीच्या अनुषंगाने यापूर्वीसुद्धा सर्व विरोधी पक्षीय नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीला शरद पवार सुद्धा उपस्थित होते. त्यात शेवटी ठरल्याप्रमाणे विधानसभेत सर्व पक्षांच्या एकमताने अतिरिक्त दहा टक्के आरक्षणाला संमती दिली गेल्याचेही डॉ. बबनराव तायवाडे म्हणाले. आता वारंवार तीच मागणी करून शरद पवार यांच्याकडे गेले असतील तर शरद पवार यांनी यापूर्वी सांगितले की केंद्र सरकार 50% ची मर्यादा जोपर्यंत रद्द करत नाही किंवा शिथिल करत नाही, तोपर्यंत हा विषय निकाली निघू शकत नाही. नाही तर शरद पवार यांनी आजवर योग्य तो तो सल्ला दिला असता. या प्रकरणात काही तरी तांत्रिक अडचण आहे, कायदेशीर अडचण असल्याचे मत डॉ. बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केले आहे.
वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लिजेंडस स्पर्धेत पाकिस्तानला हरवून युवराज, हरभजन आणि रैनाने साजरा केला जल्लोष.
आमची भूमिका वेट अँड वॉचची बबनराव तायवाडे
आमच्या ओबीसीच्या संविधानिक अधिकाराचे रक्षण करण्यासाठी पुढे काय निर्णय होते. त्यावर आम्ही लक्ष ठेवून राहू. शरद पवार काय सल्ला देतात, इतर नेते काय सल्ला देतात. सरकार काय भूमिका घेते. यावर आम्ही लक्ष ठेवून राहू. ओबीसीच्या संविधानिक भूमिकेचा रक्षण करण्यासाठी आम्ही कायम सज्ज राहु. राजकीय लोकांच्या वक्तव्यावर आमच्यासारख्या सामाजिक क्षेत्रातील लोकांनी कॉमेंट करणे मला योग्य वाटत नाही. ते आज एक बोलतात उद्या दुसर बोलतात. त्यामुळे आमची भूमिका वेट अँड वॉचची असल्याचेही तायवाडे म्हणाले.
कुणाला टार्गेट करणं हे योग्य नसून हे कुठेतरी थांबलं पाहिजे- बबनराव तायवाडे
अण्णा शेंडगेच्या राजकीय विषयावर मी काही टिपणी करणार नाही. अशा प्रकारच्या राजकीय लोकांचे वक्तव्य असतात. जोपर्यंत ते प्रत्यक्षात होत नाही तोपर्यंत आम्ही त्यावर वक्तव्य करत नाही. तसेच ओबीसी समाज आपल्या संविधानिक अधिकाऱ्याऱ्यांच्या रक्षणासाठी समोर येत आहे. यावर भुजबळ एकटे बोलत नाही. पण त्यांना टार्गेट करणं हे योग्य आहे असे मला वाटत नाही. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. अशी अपेक्षाही डॉ. बबनराव तायवाडे यांनी बोलतांना व्यक्त केली आहे.
Latest:
- ही शेळी इतर जातींपेक्षा जास्त दूध देते, पशुपालकांसाठी उत्पन्नाचा चांगला स्त्रोत आहे, त्याची वैशिष्ट्ये जाणून घ्या
- हाथीझूल आंबा: हातीझूल आंब्याची 5 किलो वजनाची जात विकसित, आता रंगीबेरंगी आंब्याच्या उत्पादनावर भर
- केटरिंग क्षेत्रात उत्तम करिअर, 12वी नंतर फूड सेफ्टी मॅनेजमेंटची पदवी मिळेल सरकारी नोकरी, 6000 रुपयांमध्ये करा कोर्स
- गीर गाय: गीर गाय दुग्धव्यवसायासाठी इतर देशी जातींपेक्षा चांगली का आहे? देखभाल, अन्न आणि कमाई याबद्दल सर्वकाही जाणून घ्या