क्राईम बिट

उधार न दिल्याने तरुणावर तलवारीने वार , डोक्याला तब्बल ७० टाके पडले..

Share Now

औरंगाबाद शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या शुभम विनायक मनगटे साईनगर शिवाजीनगर या विद्यार्थ्यावर शनिवारी रात्री दहा वाजता पुंडलिक नगर परिसरात आठ दहा जणांच्या टोळक्यांनी मारहाण केली या मारहाणीत शुभम गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला 70 टक्के पडले

याप्रकरणी शुभमने पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यश पाखरे, शुभम मोरे, अतिश मोरे, निलेश धस, शेख बादशाह, राजू पठाडे आणि आणखी दोन जणांना शनिवारी रात्री यांच्या दुकानावर जाऊन तंबाखू आणि गुटखा फुकट मागितला. फुकट न दिल्याचा राग मनात ठेऊन त्याला घराजवळील रेणुकानगर येथे मोकळया जागी नेऊन बेदम मारहाण केली.

या मारहाणीत शुभमचा कपाळावर दगड झाला असून शरीरावर चाकूचे वार देखील झाले आहेत. आणि नंतर झालेल्या आरडाओरडा नंतर परिसरातील नागरिक मदतीला धावून गेले आणि शुभंमला खासगी रुग्णालयात दाखल केले.

या घडलेल्या घटनेत पोलीस उआयुक्त दीपक गिऱ्हे यांनी घटना स्थळी चौकशी करून पुंडलिक नगर पोलिसांनी रविवारी सकाळी आरोपीला अटक केली होती. या प्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शेषराव खटाने करत आहे.

मागील दोन दिवसात या दोन घटना घडल्या असून शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उभं राहतेय. भारत नगर भागातील ऋषीकेश वंजारी या तरुणावर देखील हल्ला झाला आहे. याप्रकरणी देखील रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करणे चालू होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *