डाॅ उल्हास उढाण यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन !

औरंगाबाद.- विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. उल्हास उढाण यांचे मध्यरात्री २.३० वाजेदरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने निधन. त्यांचा मृतदेह घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे.
रविवारी मित्रांच्या भेटीसाठी मालेगावला गेले होते. रात्री ११ वाजता घरी पोहचले. मध्यरात्रीनंतर ही अतिशय दुःखद घटना घडली.
उढाण हे मितभाषी आणि अभ्यासू नेते म्हणून परिचित होते. समाजातील सर्व स्तरात सहज संचार असल्याने मित्र परिवार मोठा होता. एक चांगला नेता जिल्ह्याने गमावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *