१७ कोटींच्या भ्रष्टाचारात राष्ट्रवादीचे आमदार जेलमध्ये जाणार – चंद्रकांत खैरे

बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वाद पेटला आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यानंतर आता शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही ‘शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्रास देऊ नका आघाडीचा धर्म पाळा. असे सांगितले.

टक्केवारी घेणं आणि १७ कोटींच्या भ्रष्टाचारात राष्ट्रवादीचे बीडचे आमदार जेलमध्ये जाणार आहे’ असा इशार देखील खैरेंनी दिला आहे. बीडमध्ये आयोजित शिवसेना प्रवेशाच्या जाहीर सभेत चंद्रकांत खैरे यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. याप्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची उपस्थिती होती. महाआघाडीच्या इतर नेत्यांना इशारा देत आपण आघाडीमध्ये आहोत आपापसात मतभेद करायचे नाहीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा नाही. महाविकास आघाडीत आम्ही देखील आहोत, त्यामुळे कुठलाही शिवसैनिकावरील अन्याय सहन केला जाणार नाही, असं चंद्रकांत खैरे यांनी बजावून सांगितलं.

‘मी आघाडीच्या नेत्यांना ही सांगू इच्छितो आपण आघाडी मध्ये आहोत, आपलामध्ये मतभेद करायचे नाहीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा नाही आपण सगळे एक आहोत आपण एका कुटुंबातील आहोत उद्धवजी आपले कुटुंब प्रमुख आहेत अजितदादा प्रमुख आहेत. नेहमी गुंगीत असणारे त्यांनी समजुन घ्यावं’ असं म्हणत आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर टीका केली .

कायदा-सुव्यवस्थेच्या बाबतीत लक्षवेधी मांडणारे स्वतः कायदा किती पाळतात, ते आम्हाला माहीत आहेत’ अशी टीकाही खैरेंनी केली. बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर हे अधिकाऱ्यांना शिव्या देत आहेत. एकही अधिकारी यापुढे आमदाराचे काम ऐकणार नाही. लिहून घ्या, मी विभागीय आयुक्तांना सांगणार आहे. दिवसभर गुंगीत असणारा माणूस लोकांना शिव्या देतो त्या माणसाला जागा दाखवा, असंही खैरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *