देश

तुम्हाला व्हाट्सअपचे ‘हे’ नवीन फिचर माहित आहे का, आता तुमचा डीपी दिसेल फक्त तुमच्या आवडीच्या व्यक्तीला

Share Now

व्हॉट्सअ‍ॅप सातत्यानं अपडेट होत आहे. मागच्या काही महिन्यांपासून जर तुम्ही बघाल तर काही ना काही बदल सातत्यानं केले जात असल्याचं दिसतंय. वापरकर्त्याच्या गरज लक्षात घेऊन या गोष्टी अपडेट केल्या जात आहे. या सोशल नेटवर्कीगच्या जगात प्रत्येक कंपनीला मोठं बनायचं असून. त्यामुळे प्रत्येक पर्याय व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक किंवा ट्विटर आपल्या Appमध्ये निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यामध्ये अलिकडेच व्हॉट्सअ‍ॅपनं ऑनलाईन पेमेंटचा देखील पर्याय आणला. त्यातच आता एक असं नवं फीचर आलं आहे. ज्यामुळे तुम्हाला डीपी (फोटो), लास्ट सीन कुणी बघावं यावर बंधनं आणू शकतात. विशेष म्हणजे यावर तुम्ही ठरवू शकता, की कुणी तुमचा डीपी बघावा. तो ठरवलेल्या युझर्स व्यतीरिक्त इतर कुणालाही तुमचा व्हॉट्सअ‍ॅप डीपी दिसणार नाही. यामुळे या फिचर्सची सध्या चांगलीच चर्चा आहे.

हेही वाचा : 

काय आहे नवीन अपडेट ?

व्हाट्सअप नं आपल्या नव्या बदलावर बोलताना म्हटलंय की, ‘तुमच्या गोपनीयतेचं अधिक संरक्षण करण्यासाठी आम्ही तुमच्या गोपनीयता नियंत्रण सेटिंग्जमध्ये नवीन पर्याय सादर करत आहोत. तुम्ही आता तुमच्या संपर्क सूचीमधून तुमच्या प्रोफाइलमध्ये प्रवेश करण्यासाठी कोणता पर्याय निवडू शकता. फोटो, बायो पाहू शकता आणि शेवटचे पाहिलेले स्टेट्स म्हणजेच लास्ट सीन देखील पाहू शकतात. यापूर्वी वापरकर्त्यांकडे विशिष्ट लोकांचा लास्ट सीन किंवा प्रोफाइल फोटो लपवण्याचा कोणताही पर्याय नव्हता. पूर्वी व्हाट्सअप वापरकर्त्यांकडे तीन पर्याय होते. याता यामध्ये एक नवा पर्याय आला असून कुणी लास्ट सीन, बायो आणि प्रोफाईन फोटो पहायचा हे तुम्ही ठरवू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *