बाप लेकीच्या नात्याला काळिमा ! बापाचा मुलीवर अत्याचार
औरंगाबाद शहरात बापाने स्वतःच्या मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे . या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या बापाविरोधात वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी बापाला त्याब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, औरंगाबाद येथील वाळूज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नेरगाव येथे शेती व्यवसाय करतो. सप्टेंबर २०२१ ते जानेवारी २०२२ या पाच महिन्यापासून हा नराधम बाप स्वतःच्या अल्पवयीन १५ वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार करत होता. सदरील प्रकरणाची माहिती मुलीच्या आई किंवा भावाला सांगितल्या जीवे मारण्याची धमकी देत असे. परंतु मुलीने आईला या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे. या विषयी आईने विरोध करताच नराधमाने आईच्या डोक्यात फरशी मारून आईला गंभूर जखमी केले आहे. या प्रकरणाला कंटाळून आईने वाळूज पोलीस ठाण्यात अखेर फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी आरोपी बापाविरोधात अल्पवयीन मुलीचा छळ आणि जीवे मारण्याच्या धमकीसह पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक शेळके करीत आहेत.