नवाब मलिकांच्या अटकेनंतर, नितेश राणे यांच्या ट्विटची चर्चा

ईडीच्या अधिकाऱ्यांनी नवाब मलिक यांच्या घरी आज पहाटे धाड टाकून चौकशीला सुरुवात केली. मलिक यांना सात वाजण्याच्या सुमारास ईडीच्या अधिकाऱ्यांसह ईडी कार्यलयात दाखल झाले होते.

नवाब मलिक यांच्या अटकेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि महा विकास आघाडीला हा मोठा धक्का बसला आहे. अनिल देशमुख यांच्या नंतर मंत्रीपदावर असताना अटक झालेले नवाब मलिक हे दुसरेच मंत्री आहे.

त्यात आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केलेलं ट्वीट मात्र आज चर्चेचा आणि टीकेचा देखील विषय ठरलं आहे.
नीतेश राणे यांनी जाळ्यात अडकलेल्या डुकराच्या फोटो पोस्ट केला असून त्यावर पहचान कौन असं कॅपशन दिल आहे. यावरून पुन्हा एकदा ट्वीटरवार सुरू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *