क्राईम बिटमहाराष्ट्र

पुण्यातुन होताय मुसेवाला हत्या कांडाचे खुलासे, तहशदवादी संघटन ISI ने दिली होती सुपारी?

Share Now

सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन समोर आलं होत. सिद्धू यांच्या हत्या प्रकरणातील दोन आरोपी पुण्याचे असल्याची माहिती हाती आली होती. आरोपी संतोष जाधव, सौरव उर्फ महाकाल या दोघांचं पुणे कनेक्शन असल्याचं समोर आलं आहे. मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणात ८ लोकांची छायाचित्रं समोर आली होते. यातील सौरव उर्फ महाकाल याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केलेली आहे. महाकालचे खरे नाव सितेश हिरामण कमळे असे आहे. या प्रकरणी सितेशने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

सिद्धू मुसावाला प्रकरणात धक्कादायक माहिती, पुण्यातील सौरभ महाकालने केला मोठा खुलासा

त्याने या हत्या मागे पाकिस्तानच्या एका खालिस्तानी आतंकवाद्याचा हात आहे असे सांगितले, रविंदर सिंग उर्फ ​​रिंडा याचे नाव समोर आले आहे. मूसेवाला खून प्रकरणात पुणे पोलिसांनी पकडलेल्या महाकालने चौकशीनंतर अनेक खुलासे केले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा शूटर महाकाल याने सांगितले आहे की, लॉरेन्स बिश्नोई हरविंदर सिंग उर्फ ​​रिंडा यांच्यासाठी काम करतो.

एकदाच लावा हि झाडे: तमालपत्राच्या लागवडीतून कमी खर्चात आयुष्यभर बंपर कमाई, शासन अनुदानही देते

ISI च्या सांगण्यावरून पंजाबमधील अस्थिरतेवर टीका करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. दहशतवादी रिंडा याने ISI च्या नापाक रचनेची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई यांच्यावर सोपवली आहे. मुसेवाला हत्येप्रकरणी हा खुलासा होत असतानाच इंटरपोलने खलिस्तानी दहशतवादी रिंडाविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. ISI च्या सांगण्यावरून शीख समजत फूट पडून पंजाबमध्ये वातावरण पेटवणाचे षडयंत्र रिंडा याने केले, त्यासाठी त्याने लॉरेन्स याला नेमलं अशी माहिती महाकाल याने पोलिसांना दिली,

संतोष जाधव यांची महाकालशी ओळख लॉरेन्स बिश्नोईने करून दिली. महाकाल हा लॉरेन्स बिश्नोई टोळीसाठी काम करतो. दरम्यान, इंटरपोलनेही रिंडाविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. मात्र ही रेड कॉर्नर नोटीस पंजाबमधील गुप्तचर संस्थेच्या मुख्यालयावर हल्ला आणि ड्रोन कट प्रकरणी घडली आहे. येथे गुरुवारी संध्याकाळी उशिरा इंटरपोलने भारतातील दोन मोठ्या गुन्हेगारांविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली. यामध्ये गँगस्टरमधून दहशतवादी बनलेला हरविंदर सिंग संधू उर्फ ​​रिंडा आणि सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील मुख्य आरोपी गोल्डी ब्ररार  यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *