एप्रिल पर्यंत एकलाख तरुणांना थेट रोजगार , या क्षेत्रात आहे तरुणांना मोठी संधी
ई-कॉमर्स, ऑनलाईन शॉपिंगशिवाय आणखी एक क्षेत्र आहे जिथे मोठ्या प्रमाणावर लहान मुले, तरुण-तरुणी आकर्षित होतात. ते आहे गेमिंगचे ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन, गेमिंग अॅपचे अनेकांना वेड असते. भारतात या क्षेत्राचा झपाटयाने विस्तार होत असून पुढील काही वर्षांमध्ये त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे.
जेव्हा तुम्हाला अचानक थकवा जाणवेल तेव्हा या गोष्टी खा, तुम्हीही त्या तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता
टीमलीज डिजिटल या संस्थेच्या एका अहवालातून गेमिंग क्षेत्रातील रोजगाराच्या संधीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. भारतात गेमिंग उद्योगात २० ते ३० टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत सुमारे १ लाख नवे रोजगार निर्माण होऊ शकतात, हे विशेष. या क्षेत्रात महिलांचा ४० टक्के वाटा आहे. भविष्यात अनेक वरिष्ठ पदांवर महिला असतील.
या क्षेत्रात संधी वाढणार
-प्रोग्रामिंग गेम डेव्हलपर्स, युनिटी डेव्हलपर्स
-टेस्टिंग गेम टेस्टिंग इंजिनिअरिंग, गुणवत्ता, क्यूए लीड
-ॲनिमेशन डिझाईन मोशन ग्राफिक डिझायनर,
-व्हच्युअल रिअॅलिटी डिझायनर्स कलाकार : व्हीएफएक्स, कॉन्सेप्ट आर्टिस्ट
-इतर रोल्स कटेट लेखक, गेमिंग पत्रकार, रचनाकार
भारत दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ
– २०२६ पर्यंत गेमिंग उद्योग ३८ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढू शकतो.
– देशात सध्या सुमारे ४८ कोटी गेमर्स आहेत.
– गेमिंग उद्योगाची जागतिक बाजारपेठ सुमारे २७.२५ लाख कोटी रुपयांची आहे.
-टेस्टिंग गेम टेस्टिंग इंजिनिअरिंग, गुणवत्ता, क्यूए लीड ॲनिमेशन डिझाईन मोशन ग्राफिक डिझायनर,
-चालू आर्थिक वर्षात ७८० कोटींची परकीय गुंतवणूक या क्षेत्रात शक्य
-उत्पन्नाच्या बाबतीत भारत जगातील सहावी मोठी बाजारपेठ
-चीनमध्ये सर्वात मोठी बाजारपेठ आहे.