दीड कोटींची रोख घबाड तुकाराम सुपेचे संपले लाड : निलंबनाची कारवाई
राज्यातील पेपर फुटी प्रकरणी आणखी दोघांना पुणे सायबर पोलिसांनी अटक केली असून, काल महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्या कडून दीड कोटी रुपये रोख रक्कम आणि काही सोन्याची दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना महाराष्ट्र नागरी सेवेतील नियमान्वये त्यांना अटक झाल्यापासून निलंबित करण्यात आले आहे. त्यांना शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय पुणे येथील मुख्यालय सोडता येणार नाही, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
तुकाराम सुपे यांच्या सह महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषेदेचे माजी विभागीय अध्यक्ष सुखदेव डेरे आणि जी ए टेकनॉलॉजी कंपनीचे प्रमुख अश्विन कुमार यांनाही अटक करण्यात आली आहे. टीईटी परीक्षेच्या दरम्यान जवळपास पाच कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याची प्राथमिक माहिती तपासादरम्यान समोर आल्याची माहिती आहे, त्याच बरोबर याच टीईटी पेपर फुटी प्रकरणात आणखी काही मोठे लोक असल्याचा संशय असतो.