धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका आलाच नाही ; अजित पवार यांनी दिली महत्वाची माहिती
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने मुंबईच्या ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतीदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांना हृदयात अचानक दुखू लागल्याने दाखल करण्यात आले. त्यांना हृदयविकाराचा “तीव्र धक्का बसल्याचे सांगितले जात होते. मुंडे यांना मंगळवारी संध्याकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी मंगळवारी त्यांना सात दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती बाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी अजित पवार यांनी सांगितले कि, धनंजय मुंडे यांची प्रकृती चांगली आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली ते उपचार घेत असून . सतत प्रवास, दगदग यातून त्यांना भोवळ येऊन शुद्ध हरपली आणि त्यानंतर तातडीने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला, हि माहिती चुकीची आहे. त्यांना डॉक्टरांनी आरामाची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.