राजकारण

देवेंद्र फडणवीस: ‘कधीच स्वतःचं घर भरण्याचा विचार केला नाही, नागपूरकर असण्याचा गर्व आहे

देवेंद्र फडणवीस: ‘मी कधीच स्वतःचं घर भरण्याचा विचार केला नाही, माझं घर आजही नागपूरमध्येच आहे’

महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मतदारसंघातील प्रचार सभेत भावनिक साद घालताना सांगितले की, “मी कधीच स्वतःचं घर भरण्याचा विचार केला नाही. कधीही स्वतःचा उद्योग, शिक्षण संस्था किंवा मेडिकल कॉलेज उभारला नाही. फक्त तुमच्यासाठी काम केलं आहे.” फडणवीस यांनी या सभेत महाराष्ट्रातील वीस मुख्यमंत्र्यांमध्ये ते एकटे असे मुख्यमंत्री आहेत, ज्याचं मुंबईत स्वतःचं घर नाही. “आजही माझं घर नागपूरमध्येच आहे आणि मला नागपूरकर असण्याचा गर्व आहे,” असं ते म्हणाले.

त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीवरही भाष्य करत, “पंचवीस वर्षे विधानसभेत काम केलं, नगरसेवक आणि महापौर देखील होतो, मात्र कधीही स्वतःसाठी काम केलं नाही. समाजासाठीच काम करत आलो.”

मालवणीत फडणवीसांची सभा
सोमवारी, देवेंद्र फडणवीस मुंबईच्या मालवणी परिसरात भाजपच्या उमेदवार विनोद शेलार यांच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत. मालवणी हा मुस्लीमबहुल परिसर आहे आणि इथे रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरीवर भाजपने सतत टीका केली आहे. फडणवीस यांच्या भाषणाकडे विशेष लक्ष लागले आहे, खासकरून धर्मांतर कायद्याच्या संदर्भात त्यांनी पुन्हा “बटेंगे, कटेंगे” म्हटलं की नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *