रशियात अण्णाभाऊ साठेंचा पुतळा, देवेंद्र फडावणीस करणार अनावरण

लोककवी, लेखक आणि समाजसुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आणि त्यांच्या कार्याचा रशियाकडून गौरव करण्यात येणार आहे. रशियाचे राजधानीचे शहर मॉस्कोमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे.

भारत जोडो यात्रा : राहुल गांधी कोणत्याही हॉटेलमध्ये नव्हे तर 150 दिवस कंटेनरमध्ये रात्र घालवतील

मॉस्को शहरातील ‘रुडमिनो मार्गारेटा फॉरेन लँग्वेज स्टडी’ या संस्थेने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारला आहे. मॉस्को शहराच्या मध्यभागी एका प्रांगणात संस्थेच्या वतीने अनेक जगविख्यात व्यक्तींचे पुतळे उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये आता लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा समावेश झाला आहे.

फिश फार्मिंग सबसिडी: बायोफ्लॉक फिश फार्मिंगसाठी आता सरकार देतय 60% सबसिडी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १४ सप्टेंबरला या पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे. देवेंद्र फडणवीस हे पुढच्या आठवड्यात रशियाच्या दौऱ्यावर जाणार असून विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर हे सुद्धा या सोहळ्याला उपस्थित असणार आहेत. भारत- रशिया या दोन्ही देशांच्या राजनैतिक संबंध स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमित्ताने रशियात एका आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. ‘रुडमिनो मार्गारेटा फॉरेन लँग्वेज लायब्ररी’ मॉस्कोमध्ये १४ आणि १५ सप्टेंबर रोजी ही परिषद घेण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *