औरंगाबाद जिल्ह्यात निर्बंध कडक करण्याचा निर्णय
औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी जिल्ह्यातील लसीकरणाची कमी असलेली टक्केवारी वाढविण्यासाठी पुन्हा एकदा निर्बंधांची पाऊले उचलली. नागरिकांना लसीचा दुसरा डोस बंधनकारक करण्यात आले आहेत. दोन डोस घेतल्यानंतरच पेट्रोल, डिझेल, गॅस, सीएनजी मिळेल.
आज औरंगाबाद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक झाली, जिल्हाधिकारी त्यावेळी बोलत होते. उद्यापासून औरंगाबादेत या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असून. यापुर्वी औरंगाबादेत लसीकरणाचा टप्पा खुपच कमी होता. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महिन्यांपुर्वी कोविड लसीकरणाचा आढावा घेतला होता. त्यावेळी देशातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची ऑनलाईन व्हिडीओ काँन्फरन्स झाली होती. त्यावेळी औरंगाबादचा लसीकरणाचा टक्का कमी पाहून पंतप्रधानांनी जिल्हाधिकाऱ्यांना लसीकरण वाढविण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर औरंगाबादेत लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच पेट्रोल, डिझेल मिळतील असे लेखी आदेश दिले होते. पण त्यानंतर लसीकरणाचा टक्काही वाढला होता.
गेल्या काही दिवसात कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरविली होती. आताची स्थितीही लक्षणीय सुधारली नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. लसीकरणाचा दुसरा डोस न घेतलेल्या नागरिकांना घरगुती गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेल, सीएनजी व मोफत धान्य पुरवठा मिळणार नसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले
औरंगाबाद जिल्ह्यात कालपर्यंत ५३. ७१ टक्केच लसीकरण झाले आहे. त्यातही ग्रामीण व शहराचा विचार केल्यास ग्रामीणमध्ये ५१.७६ टक्के व शहरात ५७.७२ टक्के लसीकरण झाले. शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये लसीकरणाची टक्केवारी कमी आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाने लसीकरणासाठी नागरिक पुन्हा जागरूक होतील अशी आशा आहे.