औरंगाबाद शहरासह जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय
राज्यात वाढणारी कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे, मागील काही दिवसात वाढणारी रुग्णाची आकडेवारी चिंताजनक असून वाढणारी रुग्ण संख्या रोखण्यासाठी राज्य सरकारने शनिवारी दि ८ रोजी निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेतला आहे.
यात नागरिकांची गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे, त्यामुळे राज्यसरकारने विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी करत शाळा आणि महाविद्यालय १५ फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्यात यावे असा आदेश काढला आहे.
या संदर्भांत औरंगाबाद शहरातील आणि जिल्ह्यातील शाळा सुधारत आदेशानुसार १५ फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय देण्ययात आले आहे, परंतु यात विद्यार्थ्यांचे शैक्षकनिक नुकसान होऊ नये यासाठी ऑन लाईन पद्धतीने वर्ग घेण्याचे निर्देश देण्यात आले.
या निर्णयापूर्वी केवळ मनपा हद्दीतील शाळा पहिली ते आठवी पर्यंत बंद करण्याचाच निर्णय मनपा प्रशासनाने घेतला होता.