क्राईम बिट

पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांनी महिला आरोपीला घेतले ताब्यात

Share Now

पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांनी महिला आरोपीला ताब्यात घेतले
मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात बुधवारी रात्री एक धक्कादायक फोन आला, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. फोन करणाऱ्याने स्पष्टपणे पंतप्रधान मोदींना ठार करण्याचा कट रचल्याची माहिती दिली आणि यासाठी वेपनची तयारीही झाल्याचा दावा केला. या धमकीच्या कॉलने मुंबई पोलिसांमध्ये खळबळ माजवली, आणि पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला.

पोलिसांनी सुरवातीला फोन करणाऱ्याचा शोध घेण्यास प्रारंभ केला आणि कॉल करणारी व्यक्ती एक महिला असल्याचा तपासातून निष्कर्ष काढला. त्यानंतर पोलिसांनी शितल चव्हाण नावाच्या महिलेला ताब्यात घेतले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास चालू असून, संबंधित महिला आरोपीसह इतर बाबींना अधिक खुलासा करण्यासाठी पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

नकली सोन्याच्या विक्रीप्रकरणी खामगावात दोन आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *