कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी | नवरात्रीत होणार DA मध्ये वाढ! अधिकृत घोषणा ‘या’ दिवशी
देशभरात सणासुदीची सुरुवात झाली आहे. मोदी सरकार लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर देऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, नवरात्रीच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये सरकार सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) 4 टक्क्यांनी वाढ करू शकते. असे झाल्यास डीए ३८ टक्के होईल. केंद्रीय कर्मचाऱ्यांना १ ऑक्टोबरपासून पगारात वाढीव महागाई भत्ता मिळू शकतो. 38 टक्के डीए सह, पगार वाढून 27,312 रुपये होईल. तसेच डीएची थकबाकीही जुलैपासून मिळू शकते.
मैदा आणि रव्याच्या निर्यातीवर बंदी नंतरही गव्हाचे दर चढेच, एमएसपीपेक्षा जास्त भाव
सणांआधी महागाई भत्ता वाढेल
नवरात्रीमध्ये सरकार महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करू शकते. AICPI-IW चे आकडे ज्या आधारावर महागाई भत्ता ठरवला जातो ते देखील आले आहेत. AICPI-IW च्या पहिल्या सहामाहीची आकडेवारी आली आहे. त्यात 0.2 टक्क्यांची वाढ होऊन तो 129.2 अंकांच्या पातळीवर पोहोचला आहे. त्यामुळेच सणांपूर्वी डीए वाढण्याची अपेक्षा वाढली आहे. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना सरकारच्या डीए वाढवण्याचा फायदा होणार आहे.
टाटा उद्योग समूहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार
27,000 रुपयांपर्यंत पगार वाढेल
कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 56,900 रुपये आहे, 38 टक्के महागाई भत्ता असल्यास त्यांना 21,622 रुपये डीए मिळेल. सध्या 34 टक्के डीए दराने 19,346 रुपये 34 टक्के दराने मिळत आहेत. डीएमध्ये 4 टक्क्यांनी वाढ केल्याने पगारात 2,276 रुपयांची वाढ होईल. म्हणजेच वर्षाला सुमारे २७,३१२ रुपयांची वाढ होणार आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होईल
सरकारच्या महागाई भत्त्यात वाढ केल्याने देशातील 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख निवृत्ती वेतनधारकांना फायदा होईल कारण त्यांच्या पगारात वाढ होणार आहे. वर्षाच्या सुरुवातीला सरकारने महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढवला होता, त्यानंतर महागाई भत्ता ३४ टक्क्यांवर गेला होता. आता महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढल्याने महागाई भत्ता 38 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे.