क्राईम बिट

सुप्रसिद्ध लावणीसम्राज्ञी विजया पालव यांच्यावर जीवघेणा हल्ला

Share Now

सुप्रसिद्ध लावणीसम्राज्ञी विजया पालव यांच्यावर दिवा येथे जीवघेणा हल्ला झाला . त्या राहत असलेल्या इमारतीत बिल्डर आणि त्यांच्या कुटुंबियांकडून हल्ला केल्याचा आरोप पालव यांनी केला आहे. या प्रकरणी ठाण्यातील मुंब्रा पोलीस ठाण्यात पालव यांनी तक्रार दाखल केली असून . मुंब्रा पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करीत असल्याची प्राथमिक माहिती आहे. दोन्ही बाजूने एकमेकांवरती मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला असून . यापूर्वी देखील दोन्ही कुटुंबात अनेकदा वाद झाले आहेत. परस्पर बिल्डर पत्रव्यवहार करीत असल्याचा आरोप विजया पालव यांनी केला आहे अशी माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली आहे.

विजया पालव यांच्यावर दिवा येथे आपल्या राहत असलेल्या इमारातीच्या बिल्डर कुटुंबीयांनी मारहाण केली. मारहाणीत विजया पालव यांना दुखापत झाली असून त्यांना ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर विजया यांना घरी सोडण्यात आले आहे. विजया पालव यांनी आपल्या घरी प्लंबरला घरातील काम करण्यासाठी बोलावले होते. त्यावेळी बिल्डरने प्लंबरला हटकले आणि विजया पालव यांना बोलावून घेण्यास सांगितले. बाहेरील व्यावसायिकांना कुठलेही काम देऊ नये असा दम देण्यास सुरुवात केली. विजया पालव यांनी बिल्डरच्या मनमानीला विरोध केल्यानंतर बिल्डर चेतन पाटील यांने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून विजया यांच्या कानाखाली मारल्या असल्याचा आरोपा पालव यांनी केला आहे.

या आगोदर सुध्दा विजया पालव यांनी बिल्डरच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी सुध्दा बिल्डर आणि त्यांच्यामध्ये अनेकवेळा वाद झाले होते. बिल्डरला त्यावेळी देखील सोसायटी मधील काही जणांनी पत्रव्यवहार केला होता. मात्र त्यानंतर देखील बिल्डरची मनमानी आणि गुंडा गर्दी सुरूच असून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप विजया पालव यांनी केला आहे. तर बिल्डर ने पालव यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *