दत्तप्रसाद रानडे यांची १८ डिसेंबरला गझल मैफल
औरंगाबाद: जगविख्यात शायर बशर नवाझ यांच्या स्मृत्यर्थ स्थापन करण्यात आलेल्या बझ्म-ए-बशर व्हाट्स ऍप ग्रुपच्या वतीने येत्या १८ डिसेंबर रोजी विख्यात गझल गायक दत्त प्रसाद रानडे(पुणे) यांची ‘ दिल-ए-नादान’ ही मराठी-उर्दू गझल गायनाची मैफल होणार आहे.
सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या स्व. गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमीच्या सभागृहात शनिवारी(दि. १८) सायंकाळी साडे सहा वाजता मैफलीला प्रारंभ होईल. दत्तप्रसाद रानडे यांना तबल्यावर समीर शिणगार आणि संवादिनीवर मुकुंद पेटकर साथसंगत करणार आहेत.
हा कार्यक्रम पूर्णपणे विनामूल्य आहे. या कार्यक्रमाला गझल रसिक आणि बशर नवाजप्रेमींनी आवर्जून यावे असे आवाहन ‘बज्म – ए – बशर’ ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे. कोव्हीडबाबत सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून ही मैफल होणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
औरंगाबादच्या बझ्मे बशर या गझल विषयक ग्रुपच्या वतीने दरवर्षी गझल विषयावर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कोरोनामुळे गेल्यावर्षी कार्यक्रम आयोजित क्लरण्यात आला नव्हता. आतापर्यंत दत्तप्रसाद रानडे यांनी ‘सोबतीचा करार’ ही मैफल, वैभव देशमुख, सतीश दराडे आणि इतरांचा मराठी मुशायरा, आदी रामचंद्र यांची गझल मैफल अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन या ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.