बँकेतून तब्बल १२ कोटी २० लाख रुपयांची रोकड लंपास, बँक कर्मचाऱ्यानेच मारला होता डल्ला
आय.सी.आय.सी.आय बॅंकेच्या शाखेतून तब्बल १२ कोटी २० लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डोंबिवलीमध्ये ही घटना घडली असून चोरीचे कोट्यवधी रुपये चोरांनी आठवडाभर मुंब्रा परिसरात टेम्पोत लपवून ठेवले होते. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.
एकनाथ शिंदेंच्या बाजूने केंद्रीय आयोगाला पत्र, शिवसेना म्हणून आम्हाला मान्यता द्या
डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा परिसरातील आय.सी.आय.सी.आय बॅंकेच्या शाखेतून १२ कोटी २० लाख रुपयांची रोकड लंपास झाली आहे. बॅंकेला ९ आणि १० तारखेला सुट्टी होती. त्यानंतर ११ जुलैला, या बॅंकेमधील सीसीटीव्ही यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याचे, बॅंकेच्या लक्षात आले. त्यानंतर संबंधित बॅंक प्रशासनाने टेक्निकल टीमला संपर्क साधला आणि दुरुस्ती करून घेतली. १२ तारखेला सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असता काही फुटेज डिलीट असल्याचे आढळले.
8वा वेतन आयोग येणार? सरकार करत ही योजना
त्यानंतर बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी पैसे ठेवण्याची जागा तपासली असता, त्यातली ३४ कोटी रुपये गायब असल्याचे लक्षात आले. त्यानंतर कार्यालय तपासले असता, सुरक्षा रक्षकाला पैशांनी भरलेल्या काही बॅग्स आढळून आल्या. या बॅग्समध्ये ३४ कोटींपैकी २२ कोटी रुपये आढळून आले. तसेच, या पैशांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेला कर्मचारी अल्ताफ शेख हा देखील गायब असल्याचे लक्षात आले. या चोरीमागचा मुख्य आरोपी अल्ताफ असून, तो सध्या फरार आहे. उर्वरीत रक्कम त्याच्याकडे असू शकते, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणी ठाणे मालमत्ता गुन्हे पोलिसांनी चौघांपैकी तिघांना मुंब्रा परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत. टेम्पोमधून ५ कोटी ८० लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. मुख्य आरोपी अजूनही फरार असून, पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे