दहावी आणि बारावीच्या परीक्षाची तारीख ठरली..!
दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे विद्यार्थ्यांच शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे. शाळा , कॉलेज आणि सर्व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होत होत्या. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून शाळा कॉलेज सुरळीत चालू झाल्या आहेत. परंतू दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाइन होणार की ऑफलाईन हा संभ्रम विद्यार्थी आणि पालकांमध्ये कायम होता. मात्र आज विद्यार्थी आणि पालकांच्या संभ्रमला पूर्णविराम लागला आहे.
दरम्यान या परिक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज केली आहे.
दहावीच्या परीक्षा या १५ मार्च २०२२ ते १८ एप्रिल २०२२ दरम्यान पार पडणार आहेत.
त्याचबरोबर बारावीच्या लेखी परीक्षा या ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ दरम्यान पार होणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची सर्व काळजी घेऊन या परीक्षा नियमित पद्धतीने होणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.