ST महामंडळच विलीनीकरण शक्यच नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

एसटीच्या विलीनीकरणाच्या मागणीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट सांगितले की, एसटी कामगाराचं शासनात विलिनीतरण शक्य नाही.
अजित पवार यांनी विधानसभेत बोलताना सांगितले आहे. अजित पवार यांच्याकडे अर्थमंत्रालयाचीही जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांनी दिलेल्या स्पष्ट निवेदनाने सरकारची एसटी कामगाराच्या बाबतीतील भूमिका स्पष्ट झाली आहे.
कधीकाळी अशा संपामुळे मुंबईतला गिरणी कामगार उध्वस्त झाला, देशोधडीला लागला. एसटी कामगारांच्या बाबतीत तसे होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करून पवार म्हणाले की, पगारवाढ आणि भत्त्यांबाबतच्या मागण्या शासनाने मान्य केल्या आहेतच.. तसंच ज्या संघटनेनं संपाची हाक दिली, त्यांनीच संप मागे घेतला आहे, तरीही एसटी कर्मचारी विलिनीकरणावर कायम आहेत, त्यांनी विलिनीकरणाचा मुद्दा आपल्या डोक्यातून काढून टाकावा असं आवाहनही अजित पवार यांनी संप करणाऱ्या कर्मचारी वर्गाला केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *