फसवणूक झालेल्या नागरिकांना सायबर सेलने मिळवून दिले तब्बल साडेपाच लाख रुपये
फसवणूक झालेल्या नागरिकांना सायबर सेलने
मिळवून दिले तब्बल साडेपाच लाख रुपये
कोरोना महामारी मुळे संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन लावण्यात आले होते. त्यावेळी नागरिकांना हवा तेवढा रोजगार मिळत नव्हता. आणि व्यवसाय बंद असल्यामुळे उद्या खाणार काय हा प्रश्न उभा राहत होता. हातावर पोट असलेल्याचे तर वेगळेच हाल होते. त्याचबरोबर नवीन उद्योग गुंतवणुकीसाठी पुढे येत नसल्यामुळे छुपी बेरोजगारी अजूनही वाढत आहे. ऑनलाइनच्या जगात आता बेरोजगारांना गंडविणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत.
कोरोनामूळे आता सर्वच व्यवहार ऑनलाईन झाले आहेत. यामुळे डमी वेबसाईट वर अनेकांची नजर जाते. एडमिन वेबसाईट कडे काही जण दुर्लक्ष करतात तर काही यामध्ये फसतात. कोरोनाचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी सर्व कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम ही टेक्निक वापरली होती. यामुळे सर्व उद्योग धंदे ऑनलाइन केले जात होते. यामुळे ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढले. ऑनलाइन केवायसी भरून देण्यात प्रॉब्लेम येत असल्याचे सांगून बेरोजगारांना गंडविण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. ऑनलाईन फसवणूकीचे सत्र बऱ्याच दिवसापासून सुरु आहे. आता जॉब, लॉटरी, लोन या सर्वांचे आमिष दाखवून सर्वसामान्यांची फसवणूक केलेल्या पंधरा ते वीस तक्रारीची दखल घेऊन सायबर सेलने फसवणूक झालेल्या नागरिकांना तब्बल साडेपाच लाख रुपये मिळवून दिले आहे.
हाताला काहीच काम नसल्यामुळे संसाराचा गाडा कसा चालवायचा हा प्रश्न सतत उभा राहत होता, म्हणून बऱ्याच जणांनी तात्काळ कर्ज, कमी पैशात लाखोंची लॉटरी तसेच नोकरी लावून देण्याच्या आमिष दाखवणारी अनेक संकेतस्थळ सुरू केली. गेल्या दोन महिन्यात बारा नागरिकांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी सायबर पोलीस ठाण्यात आल्या होत्या. याची दखल घेऊन तांत्रिक तपास करत सायबर सेलने फसवणूक झालेल्या नागरिकांचे पैसे परत दिले. सदरची कारवाई पोलिस निरीक्षक गौतम पातारे, पोलिस उप निरीक्षक राहुल चव्हाण, सुशांत शेळके,विजय घुगे,मन्सूर शहा,रवी पोळ, रामप्रसाद काकडे, संदीप पाटील यांनी केली.
अशी झाली फसवणी…..
पहिल्या घटनेत अनिकेत याला पाच लाख रुपयाची कर्जाची ऑफर आली. यासाठी अनिकेतने दिलेल्या संकेतस्थळावरुन माहिती घेतली. या नंतर त्याला कॉल आला की तुम्हाला कर्जाची फाईल मंजूर झाली असून यासाठी दहा हजार भरावे लागेल. लोन मिळणार असल्याने अनिकेताने उसनवारी करून पैसे कंपनीने दिलेल्या खात्यात पैसे भरले. परंतु असे झाल्यानंतर फाईल मध्ये अनेक त्रुटी असल्याने आणखी पैसे भरण्याची मागणी केली. दरम्यान फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्या नंतर अनिकेत ने थेट सायबर सेल कडे तक्रार केली.
दुसऱ्या घटनेत सुनील हा सोशल मीडियावर सर्च करत असताना त्याला कमी पैष्यामध्ये दुप्पट पैसे मिळतील अशी एक माहिती माहिती मिळाली. यावरून त्याने त्यासंबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी संकेतस्थळावर भेट दिली. दरम्यान कंपनीतून अधिकारी बोलतो असा कॉल आला यावेळी अल्प गुंतवणुकीत दुप्पट पैसे मिळतील अशी माहिती त्या अधिकाऱ्याने सुनीलला दिली. या माहितीच्या आधारे पंचवीस हजार रुपये पाठवले त्याचा मोबदला म्हणून तात्काळ त्याला दहा हजार रुपये पाठवले. पैसे मिळतात या आमिषाने सुनीलने आणखी मोठी गुंतवणूक केली.तसेच याची माहिती जवळच्या मित्रांना दिली. सूनीलाच एकूण मित्रांनी देखील गुंतवणूक केली खरी पण त्यांना परतावा मिळाला नाही. त्यांनी कंपनीला विचारपूस केली असता कंपनीने आणखी पैसे गुंतवा मग परतावा मिळेल असे सांगितले. पण आपली फसवणूक होत असल्याचे काहींच्या लक्षात आल्याने त्यांनी सायबर सेल कडे तक्रार दिली.
तिसऱ्या घटनेत अभियांत्रिकीच उच्छाशिक्षित अमोल हा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर घरीच होता.नोकरी मिळावी यासाठी त्याने काही संकेतस्थळाना भेटी दिल्या.भेटी दीलील्या संकेत स्थळावरून कॉल आला. नावाजलेला कंपनीत नोकरी लावून देण्याच आश्वासन अमोलला दिले.यासाठी पंचवीस ते तीस हजार रुपये भरावे लागेल असे सांगितले.नावाजलेल्या कंपनीत नोकरी मिळत असल्याने अमोलने नातावेईकाकडून उसने पैसे घेऊन सांगितलेल्या खात्यात जमा केले.कंपनीने सांगितलेल्या दिवसात नोकरीच ऑर्डर येईल या अपेक्षेने बसलेल्या अमोलने काही दिवसांनी कंपनीशी संपर्क साधला.यावेळी कंपनीचा क्रमांक बंद केला होता.आपली फसवणूक झालेल्या अमोलच्या लक्षात आल्याने त्याने सायबर पोलिसांकडे तक्रार दिली.
याबाबत सायबर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांकडे मोबाईल आल्याने सर्वच सोशल मीडियावर सक्रिय झाला आहे.सोशल मीडियावर नागरिकांचं प्रमाण वाढल्याने सायबर भामटे देखील सक्रिय झाले असून वेग वेगळे आमिष दाखवून फसवणूक केली जात आहे.नागरिकांनी सोशल मीडिया वापरतांना काळजी घ्यावी.फसवणूक झाली असल्यास तात्काळ सायबर सेलकडे तक्रार करावी असे आवाहन या सेलने केले आहे.