महाराष्ट्रराजकारण

” पटोलेंची जीभ कापणाऱ्यास १ लाख रुपये बक्षीस “, जालन्यात भाजप युवा मोर्च्याने केली घोषणा

Share Now

जालना ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर नाना पटोले यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाली आहे. “पटोलेंची जीभ कापा आणि १ लाख रुपये घेऊन जा” अशी घोषणा भाजप युवा मोर्चाचे जालना जिल्हाध्यक्ष सुजित जोगस यांनी केली आहे. तसेच त्यांनी जालन्यातील कदीम पोलिस ठाण्यात पटोलें विरुद्ध गुन्हा देखील दाखल केला आहे. महाराष्ट्रात नारायण राणे यांच्यासाठी वेगळा कायदा आणि नाना पटोले यांच्या साठी वेगळा कायदा आहे का? असा सवाल देखील भाजपा युवा मोर्चाच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.

दरम्यान, या मुद्द्यांवर नाना पाटोले यांनी त्यांची बाजू मंडली होती ते म्हणाले, “माझ्या मतदारसंघातील मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत नागरिकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या असता मी त्यांच्याशी बोलतानाचा व्हिडीओ खोडसाळपणे सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. मी पुन्हा स्पष्ट करतो मी तिथे पंतप्रधान मोदींबद्दल नाही,तर मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत बोलत होतो.” असे ते म्हणाले.

तसेच भंडारा , नाशिक आणि नागपूर या ठिकाणी यांच्याविरोधात भाजपच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली. नागपूरच्या कोराडी पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावेळी भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजपचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *