औरंगाबादमध्ये जमावबंदी ; राज ठाकरे यांच्या सभेवर टांगती तलवार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या १ मे रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर होणाऱ्या सभेला पाच दिवस शिल्लक राहिले असून अद्याप पोलिसांनी सभेसाठी परवानगी दिलेली नाही. परवानगीच्या भानगडीत पडू सभेच्या तयारी लागा असे आदेश राज ठाकरे यांनी मनसेच्या नेत्यांना आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिल्याची आदींची उपस्थिती होती. माहिती पक्षसूत्रांनी दिली.
हे वाचा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार आज औरंगाबाद दौऱ्यावर
औरंगाबाद पोलिसांनी काढलेल्या जमावबंदीच्या आदेशानुसार, २६ एप्रिल ते ९ मे या काळात औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू असणार आहे. या आदेशानुसार, पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास बंदी असेल. शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिली. पण, आता या आदेशामुळे राज ठाकरे यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणारी सभा रद्द करावी लागणार असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा : कापसाच्या दराचा चढता क्रम, अंतिम टप्यात असूनही विक्रमी दर