मातोश्रीवर शिवसैनिकांची गर्दी ; रवी राणा मातोश्रीवर जाण्यास ठाम
दोन दिवसापूर्वी आमदार रवी राणा आणि खा. नवनीत राणा यांनी मातोश्रीसमोर जाऊन हनुमान महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या भोंगे आणि हनुमान जयंती हनुमान चालीसा मुद्दा चर्चेत आहे. आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर समोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचा सांगितले आहे.
उद्या सकाळी ९ वाजता मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार असं रवी राणा, म्हणाले यामुळे मातोश्रीवर सकाळपासूनच शिवसैनिकांनी गर्दी केली होती. आमदार रवी राणा यांच्या विरोधात शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली त्यानंतर दुपारी साडेचार वाजता स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले त्यांनी जमलेल्या शिवसैनिकांचे हात जोडून आणि हात उंचावून आभार देखील मानले.
आज सकाळी पुन्हा एकदा फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून आमदार रवी राणा यांनी संवाद साधला आहे. त्यांनी शिवसेनवर तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्यावर गंभीर आरोप केले आहेत,
रवी राणा म्हणाले कि, शिवसैनिकांची दादागिरी सुरु आहे, तरी आम्ही मातोश्री समोर जाणार आणि हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे सांगितले आहे.तसेच हनुमान चालीसा म्हणण्यापासून मला कोणी रोखू शकत नाही. महाराष्ट्र कुठे चालला आहे. महाराष्ट्राच्या सुख शांततेसाठी आम्ही जात आहोत. आम्हाला कोणी रोखू नये असे आवाहन रवी राणा त्यांनी केले आहे.
संपूर्ण व्हिडिओ बघा रवी राणा काय म्हणाले ?
तसेच बाळासाहेबांचे शिवसैनिक असते तर आम्हाला मातोश्रीवर जाऊ दिले असते मात्र बाळासाहेबांच्या विचाराचे शिवसैनिक आता उरले नाही. पोलीस देखील आम्हला रोखत आहेत, तरी आम्ही मातोश्रीवर जाणारच असल्याचे रवी राणा यांनी सांगितले. आमच्या घरावर हल्ला करण्याचे आदेश दिल्याचा आरोपही यावेळी रवी राणा यांनी केला.
आम्ही शांततेच्या मार्गाने मातोश्रीवर जात आहे. मी त्याठिकाणी महाराष्ट्राच्या शांततेसाठी, शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी जात असल्याचे राणा यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे हे आमच्या हृदयात आहेत. सध्या मुख्यमंत्री मात्र, कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करत असल्याचे राणा म्हणाले.
हेही वाचा :- नवाब मलिक याना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका