राजकारण

केजमध्ये नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवकांसह अकरा जणांवर गुन्हा

Share Now

बीड जिल्ह्यातील केज मध्ये मनाई आदेश लागू असताना देखील नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांचे निवडीनंतर मिरवणूक काढणं महागात पडलं आहे जमावबंदीचे उल्लंघन केल्याने राज्यसभेच्या खासदार रजनीताई पाटील यांचे चिरंजीव नगरसेवक आदित्य पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

जिल्हाधिकारी आदेशाचे पालन न करता जमाव गोळा करणे शहरातील नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना महागात पडलं नगरपंचायतीची निवड झाली पदभार घेण्यापूर्वीच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर तेच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

केज नगरपंचायतीवर भाजप पुरस्कृत स्थानिक आघाडी सत्तेवर आहे यात महत्त्वाची बाब म्हणजे काँग्रेसच्या मदतीने स्थानिक आघाडीचा नगराध्यक्ष बनला या निवडीवर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

जिल्हाधिकारी यांनी मनाई आदेश लागू केला आहे, या आदेशाच्या अनुषंगाने पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांनी गर्दी न करण्याबाबत दिलेला आदेश मोडला.
या प्रकरणी उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्या फिर्यादीनुसार जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *