कोव्हीशिल्ड लसीने मुलीचा मृत्यू ? औरंगाबादमध्ये मृत मुलीच्या वडिलांनी मागितली १ हजार कोटींची भरपाई
औरंगाबाद येथील रहिवासी स्नेहल लुनावतचा मृत्यु कोव्हीशिल्ड लसीने झाल्याचा आरोप स्नेहलचे वडील दिलीप लुनावत यांनी केला आहे. स्नेहल नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील दंत महाविद्यालयात शिक्षण घेत होती . २८ जानेवारी २०२१ रोजी कोविशील्डची लस घेतली.
त्यांना ५ फेब्रुवारी २०२१ रोजी डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. नाशिक येथील डॉक्टरांनी लस घेतल्याने काही प्रमाणात साइड इफेक्ट होतो असे सांगितले. परंतु डॉ. स्नेहल लुणावत हिने कोविशील्ड लस घेतल्यानंतर तिचा साइड इफेक्टमुळे मुत्यू झाल्याचा आराेप करत तिचे वडील दिलीप लुणावत यांनी केली आहे.
डॉ. स्नेहल लुणावत हिने कोविशील्ड लस घेतल्यानंतर तिचा साइड इफेक्टमुळे मुत्यू झाल्याचा आराेप करत तिचे वडील दिलीप लुणावत यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यात सीरम संस्थेसह बिल गेट्स फाउंडेशन, राज्य शासन आणि केंद्र सरकारला प्रतिवादी करण्यात आले आहे. सीरम संस्थेने एक हजार काेटींची नुकसान भरपाई द्यावी, डाॅ. स्नेहल काेराेना याेद्धा असल्याने तिला शहीद घाेषित करून तिच्या नावे वैद्यकीय संस्था सुरू करावी, अशी विनंतीही याचिकेत अरण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने जेकब पुलियेल विरुद्ध केंद्र सरकार खटल्यात लस बनवणाऱ्यांनी चुकीचे काही केले असेल तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, असे २८ नोव्हेंबर २०२१ रोजी एका सुनावणीत स्पष्ट केले आहे. त्यानुसार सीरमवर कारवाई करावी. तसेच ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या संचालकांनी लसीच्या सुरक्षिततेचा केलेला दावा खोटा आणि चुकीच्या दाव्यावर आधारित असल्याचा लुणावत यांचा आराेप आहे
डाॅ. स्नेहल यांना ७ फेब्रुवारी रोजी रात्री २ वाजता उलट्या झाल्या. तेथील आर्यन रुग्णालयात त्यांनी दाखवले तेव्हा मेदूतून रक्तस्राव होत असल्याचे निदान झाले. संबंधित रुग्णालयात मेंदू शल्यचिकित्सक नसल्याने त्यांनी दुसऱ्या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी सांगितले. डॉ. स्नेहल १४ दिवस अतिदक्षता विभागात राहिल्यानंतर १ मार्च २०२१ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
डाॅ. स्नेहल लुनावतचे वडील दिलीप लुणावत यांनी याचिकेत म्हटले आहे, की पुणे येथील सीरम संस्थेने लसीचा साइड इफेक्ट नसल्याचा केलेला दावा खोटा आहे. असे मृत्यू रोखण्यासाठी सरकारने उपाययोजना कराव्यात. सीरमने १ हजार कोटी रुपयांची भरपाई द्यावी. गुगल आणि यूट्यूब कोविडमध्ये मरण पावलेल्या नागरिकांसंबंधी खोटी माहिती देत असल्याने भारत सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी. आफ्टर इफेक्ट फॉलोइंग इम्युनायझेशन कमिटी यांच्या २ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या अहवालात डॉ. स्नेहलचा मृत्यू साइड इफेक्टमुळे झाल्याचे नमूद केले आहे.