क्राईम बिट

सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी युट्युबरला दिलासा, कोर्टातून जामीन

Share Now

सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या युट्युबरला दिलासा देत मुंबई न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आहे त्याच्या जामीन अर्जात, गुज्जरने असा दावा केला आहे की त्याला “कोणत्याही योग्य किंया ठोस सामग्रीशिवाय या प्रकरणात खोटे गोवण्यात आले आहे” आणि त्याचे व्हिडिओ केवळ मनोरंजन आणि प्रसिद्धी मिळविण्याच्या उद्देशाने बनवले गेले आहेत.अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या यूट्यूबरला जामीन मिळाला आहे. मुंबईतील एस्प्लेनेड मॅजिस्ट्रेट कोर्टाने सोमवारी युट्युबरला जामीन मंजूर केला, आरोपीला गेल्या महिन्यात अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी आणि गैंगस्टर लॉरेन्स बिश्रोईजी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.गुन्हेगारी धमकी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदीनुसार You Tuber विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. विश्रोईशी संबंध असल्याचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 12 जून रोजी पोलिसांनी राजस्थानमधील रहिवासी बनवारीलाल लातुरलाल गुजर यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला होता.

रेल्वेने वेटिंग तिकिटाचा बदलला नियम, आता ही चूक झाल्यास भरावे लागणार भाडे.

आरोपीचा विश्नोई टोळीशी संबंध नाही पोलीस
पोलिसांनी सांगितले होते की, गुज्जरने त्याच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये खानला मारणे आणि लॉरेन्स बिश्नोई, गोल्ड ब्रार आणि इतर गुंडांशी त्याचे संबंध असल्याचे सांगितले होते. मात्र, पोलिसांनी गुज्जरला उचलून त्याची चौकशी केली असता, त्याचा बिश्नोई टोळीशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांना समजले आणि त्यांनी केवळ लोकांचे लक्ष वेधण्यासाठी मोठे दावे करत हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला होता

Mystery of Shri Jagannath Temple Mahaprasad

लोकांचे लक्ष वेधण्यासाठी बनवलेला व्हिडिओ
वकील फैज मर्चेंट मार्फत दाखल केलेल्या त्याच्या जामीन याचिकेत, गुज्जरने दावा केला आहे की त्याला ‘कोणत्याही योग्य किंवा ठोस सामग्रीशिवाय या प्रकरणात खोटे गोवण्यात आले आहे” आणि त्याचे व्हिडिओं केवळ मनोरंजन आणि प्रसिद्धी निळविण्याच्या उद्देशाने बनवले गेले आहेत
गुज्जरच्या याचिकेत दावा करण्यात आला आहे की व्हिडिओची प्रत एफआयआरमध्ये आहे आणि त्यात कुठेही अर्जदाराने म्हटले नाही की
तो सलमान खानला मारणार आहे त्यामुळे गुजर यांच्याविरुद्ध खटल्यात लावण्यात आलेली कलमे लावली जात नाहीत, असा युक्तिवाद

याचिकेत करण्यात आला होता.
दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. आर पाटील यांनी गुजर यांना जामीन मंजूर केला. मात्र, सविस्तर आदेश अद्याप उपलब्ध झालेला नाही

Latest:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *