newsकोरोना अपडेटमहाराष्ट्र

देशावर पुन्हा कोरोनाचे संकट?, २४ तासात थक्क करणारी रुग्णवाढ

Share Now

देशात कोरोनाच्या संसर्गात मोठी वाढ झाली असून. गेल्या 24 तासांत 4 हजार 41 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. तसेच गुरुवारी दिवसभरात 10 रुग्णांच्या मृत्यची नोंद झाली आहे. मार्च महिन्यानंतर देशात झालेली सर्वाधिक रुग्ण वाढ आहे. 11 मार्चनंतर देशात ही सर्वात जास्त कोरोना रुग्णांची नोंद आहे. कोरोनाबाधितांची संख्या तीन हजारांवरून चार हजारांवर पोहोचली असून. आधीच्या दिवशी देशात 3 हजार 712 नवीन रुग्ण आढळले होते. त्यानंतर हा आकडा चार हजारांवर पोहोचला. देशात कोरोनाच्या संसर्गात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 20 हजार 177 एवढी झाली. सक्रिय रुग्णांची दर 0.05 टक्के एवढा आहे. तसेच देशातील रुग्ण बरे होण्याचा दर 98.74 टक्के आहे. गुरुवारी दिवसभरात 2 हजार 363 रुग्ण बरे झाले आहे. तर गेल्या 24 तासांत 10 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 4 लाख 25 हजार 379 नमुने तपासण्यात आले आहे. देशव्यापी कोरोना लसीकरणात आतापर्यंत 193 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या.

हेही वाचा: काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी कोरोना पॉझिटिव्ह

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण, देशात तिहेरी आकडा 

 भारतात कोरोनामुळे आतापर्यंत 5 लाख 24 हजार 651 जणांचा मृत्यू झाला असून. देशात कोरोना विषाणूच्या संसर्गातून 4 कोटी 26 लाख 22 हजार 757 रुग्ण बरे झाले. महाराष्ट्रात सर्वाधिक नवे रुग्ण आढळले आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रा 10हजार 45,
दिल्लीमध्ये 373, तामिळनाडू 145, तेलंगणात 67, गुजरातमध्ये 50 तर मध्य प्रदेशमध्ये 25 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

हेही वाचा : पीएम किसानः ज्या शेतकऱ्यांना 11व्या हप्त्याची रक्कम अद्याप मिळाली नाही, त्यांनी इथे संपर्क करा

देशात कर्नाटकचे आरोग्य मंत्र्यांना व मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोरोनाची लागण
कर्नाटकच्या आरोग्य मंत्री के. सुधाकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी गुरुवारी ट्विट करत ही माहिती दिली आहे. तसेच महारष्ट्रात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे आणि कॉंग्रसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांना देखील कोरोनाची लग्न झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *