convert pain to power!-“रश्मी नायर ” यांची ही मुलाखत
लहानपणापासूनच धाडसी, नेतृत्व करणाऱ्या वातावरणात वाढलेली या गुजराती मुलीचा प्रवास तिला केरळ पर्यंत घेऊन गेला !
औरंगाबादच्या सतीश मोटर्स मध्ये सेल्स आणि क्रेडिट मॅनेजर असलेल्या “रश्मी नायर ” यांची ही मुलाखत-
रश्मी एका गुजराती छोट्या मुलीचा प्रवास कसा सुरू झाला.?
-माझं बालपण एका गुजराती एकत्रित कुटुंबातून आहे , shearing caring प्रमाणे आहे, आम्ही सात भाऊ बहीण आहोत. माझे प्रेरणास्थान माझे आजोबा आहेत, ते स्वतंत्र सैनिक होते. मला कुठलीही गोष्ट सहजपणे मिळाली नाही, मी प्रत्येक गोष्टसाठी घरच्या सोबत भांडले आणि मिळवलं देखील. माझ्या वडिलाची आणि आजोबांचा नेतृत्वगुण मला शाळेत, कॉलेजमध्ये आणि आता जॉबमध्ये देखील कामी पडला.
मी कॉलेजमध्ये निवडणूक लढले आणि निवडून देखील आले. आयुष्यात मी पुढे जात गेले आणि मला यश मिळत गेलं. काही तरी वेगळं करायचा उद्देश होता, मला आर्किटेक्ट व्हायचं होत पण काही कारणास्तव बी एस सी नंतर एमबीए कडे वळले. नंतर नौकरी लागली क्रेडिट मॅनेजर झाले ,नौकरी करत असताना माझी भेट माझ्या पतींशी झाली. आम्ही सोबत काम करत असताना आमचे जवळीक होत गेली, सोबत एक फायनान्स बिझनेस सुरु केला. आमच्यातील पती-पत्नी पेक्षा मैत्री च नातं बनत गेलं.”
मेल डॉमिनंट असलेल्या मार्केटिंग च्या क्षेत्रात तुम्ही पाय कसे रोवले?
-मुळात माझा फायनान्स क्षेत्रात मोठा अनुभव आहे.जवळपास अठरा वर्षांचा !
काम करत असताना एक मोठी ऑपॉर्च्युनिटी आली ब्रँड्स सोबत काम करण्याची. कमर्शिअल इंडस्ट्री मेल डॉमिनंट आहे, सतीश मोटर्स मध्ये फायनान्स मॅनेजर म्हणून जॉईन झाले.व्यवस्थापक म्हटलं जबाबदारी मोठी. त्यात पूर्ण टीम ला सांभाळून घ्यावं लागत. तुम्ही जर तुमची जबाबदारी चांगली पार पडली तर रिवॉर्ड मिळतं, कामाच्या स्वरूपात बदल होतो. मलाही रिवॉर्ड मिळालं आणि सेल्स मॅनेजर म्हणून माझी निवड झाली. मेल डॉमिनंट असलेल्या या क्षेत्रात मी महिलांचा सहभाग वाढवायचा ठरवलं आणि माझ्या सोबत आणखी सेल्स एक्झिकेटिव्ह जॉईन करून घेतले. आज आमची टीम आहे जी उत्तम प्रकारे काम करतेय.
एवढा सगळा संघर्ष करून तुम्ही सगळं काही सुरळीत झालेलं असताना तुमच्या समोर कॅन्सर झाल्याच कळलं तेव्हा तुम्ही मानसिक दृष्ट्या कसं सांभाळून घेतलं.?
-आयुष्यात चढ उतार यायलाच हवे, कायम चॅलेंज पाहिजे. जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मी खूप विचार केला, पण मनस्तीती बनवून घेतली होती की आपल्याला खंबीर व्हावं लागले. माझे काही डॉक्टर मित्र आहेत त्यांनी मला समजावून काढलं की रश्मी तुला खंबीर व्हावं लागेल स्वतःला या गोष्टीला घेऊन positive thinking ठेवावी लागले. यावर उपाय आहे तुला फक्त संयम ठेवावा लागेल.
तुम्हाला जर कुठला आजार झाला असेल तर तुम्ही त्याला असं समजू नका की, तुम्हाला पूर्ण विराम लागला आहे असं, तो क्वामा समजून पुढे जायला हवं.
स्त्रियांचं सौंदर्य हे तिच्या केसांमध्ये असत, तुम्हाला जेव्हा केमो मुळे केस गमवावे लागले तेव्हा ऑफिस, घरातल्या आणि समाजातल्या लोकांच्या नजरेचा सामना कसा केला?
-कॅन्सर झाल्यामुळे मला माहिती होतं पुढे चालून माझे केसं गळणार, त्यामुळे आधीं बॉयकट केली. त्या हेअरकट ला घरच्यांनी-मैत्रिणींनी सगळ्यांनीच अपेक्षेपेक्षा उत्तम प्रतिसाद दिला. अगदी सर्वांनी कौतुकही केले. पण पुढच्या ८-१० दिवसातच माझे सगळे केस गळून गेले. तेव्हा माझ्या मुलानी मला प्रोत्साहित केलं. पण मला माझ्या केसापेक्षा माझं आयुष्य महत्त्वाचे आहे. वयवर्ष चाळीस पर्यँत तुम्ही सेट झालेले असतात त्यामुळे बरेच जण मनावर घेत नाहीत, आपल्याला काही तरी आढळलं तर त्याचा इलाज आपण लवकर करायला हवा. तुम्ही स्वतःसाठी जगा आपल्या परिवारासाठी जगायला पाहिजे.
Rashmi you have always been a bold, dashing personality.Your story is really inspiring and I am so proud of you and how you have overcome such a difficult phase. Wishing you Godspeed recovery!
Very very inspired story of ma’ams life. I know her very well… She is a very brave women.
She likes except challenges in evry stage of life… I am also inspired by her motivation.
Wants to give her one msg…
” ma’am no one is like as yoy… You are my inspiration…
And I do my life travel by your motivating thoughts..
Be happy… Be success in your life..
“ये साला कॅन्सर आपका कुछ नही बिगड सकता… आप सिर्फ लढो… ये खुद ब खुद आपका रस्ता छोड देगा….
Very very inspired story of ma’ams life. I know her very well… She is a very brave women.
She likes except challenges in evry stage of life… I am also inspired by her motivation.
Wants to give her one msg…
” ma’am no one is like as yoy… You are my inspiration…
And I do my life travel by your motivating thoughts..
Be happy… Be success in your life..
“ये साला कॅन्सर आपका कुछ नही बिगड सकता… आप सिर्फ लढो… ये खुद ब खुद आपका रस्ता छोड देगा….