काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची बैठक सुरू ; कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाबाबत निर्णय होण्याची शक्यता ?
उत्तर प्रदेश, मणिपूर, पंजाब, गोवा आणि उत्तराखंड या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या यात काँग्रेसला अनपेक्षित पराभव झाला आहे. तसेच सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी रविवारी सायंकाळी चार वाजता काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक सुरु झाली आहे.
या बैठकीला काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी यांचीही उपस्थिती आहे. त्याशिवाय मुकुल वासनिक, अंबिका सोनी, गुलमा नबी आझाद यांच्यासह काँग्रेसचे इतर नेतेही उपस्थित होते.
या बैठकीत पाच राज्यातील काँग्रेसच्या कामगिरीवर विचारमंथन होणार आहे. सुत्रांच्या वृत्तानुसार, या बैठकीत काँग्रेस अध्यक्षपदाबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या बैठकीत G-23 चे नेतेही असतील, जे नेतृत्व बदल आणि संघटनात्मक सुधारणांच्या मागणीचा पुनरुच्चार करु शकतील.