आ. रमेश बोरणारे यांच्या भावाने एक महिन्यांपूर्वी केली महिलेला मारहाण काय आहे नेमकं प्रकरण.?
शिवसेना आमदाराच्या भावाने महिलेला केली होती मारहाण आ. रमेश बोरणारे यांच्यासह कुटुंब आणि भावजय व चुलत भावाला मारहाण केल्याचे प्रकरण राज्यभर चांगल गाजत आहे. त्याचा चुलत भाऊ आणि पुतण्याचाही आणखी एक मारहाणीचा प्रताप समोर आला आहे. बोरणारे यांच्या शेतात बांधाला बांध असलेले एक महिला आणि त्यांच्या शेतातील मजुराला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचं समोर आले. ८ जानेवारी रोजी हा प्रकार घडला असून या प्रकरणात विरगाव पोलीस ठाण्यात अदाखलपात्र गुन्हा दाखल नोंदवला.
यामुळे बोरणारे कुटुंबीयांची हिमत वाढल्याने थेट भावजयीला मारहाण केल्याचे स्पष्ट झाले, मात्र अशा राजकारण्यांना पोलीस का पाठीशी घालते हा प्रश्न उद्भवतो.
आमदार रमेश बोरनारे यांचा भाऊ संपत बोरणारे त्याचा मुलगा अजिंक्य बोरणारे यांनी शेताच्या शेजारी असलेल्या नीता श्याम तांबे आणि शेतमजूर राहुल साळवे मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देखील दिली.
या प्रकरणात स्मिता तांबे यांच्या फिर्यादीवरून संपत बोरणारे आणि अजिंक्य बोरणारे यांच्याविरोधात विरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता.
रमेश बोरणारे यांच्या कुटुंबातील व्यक्तीकडून महिलेस मारहाण होणारी दुसरी घटना समोर आली आहे. मात्र पहिल्या प्रकरणात गंभीर दखल का घेतली नाही, जेणे करून हा प्रकार घडलंच नसता. यामुळे पोली प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होतोय.