महाराष्ट्र

आ. नितेश राणे यांच्या तब्येत बिघडली, उपचारासाठी कोल्हापूरला जाणार

Share Now

भाजपचे आ.नितेश राणे यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे. नितेश राणे यांच्या छातीत दुखत असल्यानं त्यांना कोल्हापूर येथे हलवण्यात येणार आहे. कोल्हापूरातील शासकीय रुग्णालयात त्यांची तपासणी केली जाणार आहे. कार्डियाक सिस्टीम उपलब्ध नसल्यानं कोल्हापूरमध्ये तपासणी केली जाणार आहे. नितेश राणे यांना काल रात्री न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर त्यांना कणकवलीहून ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल केल होतं. रक्तदाब वाढल्यानं त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

संतोष परब हल्ला प्रकरणी दोन दिवस पोलीस कोठडीत असणाऱ्या नितेश राणे यांना शुक्रवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सलीम जामदार यांच्यासमोर ही सुनावणी झाली. आमदार नितेश राणे यांना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

याप्रकरणी आज जिल्हा सत्र न्यायालयात आज सुनावणी होणार होती. परंतु, सरकारी वकिलानं म्हणणं मांडण्यासाठी वेळ मागितली आहे. ज्यामुळं नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सोमवारी किंवा मंगळवारी होणार सुनावणी होणार आहे. नितेश राणेंची चौकशी करून माजी आमदार आणि भाजपचे नेते प्रमोद जठार जिल्हा सत्र न्यायालयात आले आहेत.

आ. नितेश राणे याना पोलीस कोठडी का ?

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूकत शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी आमदार नितेश राणे वादाच्या भावर्‍यात आडकले आहेत. १८ डिसेंबर २०२१ रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते.मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात आली. सचिन सातपुते आ. नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या प्रकरणात नितेश राणेंची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *