आ. रवी राणा याना भेटताच नवनीत राणा याना फुटला अश्रूचा बांध ; सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय व्हायरल
आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांची १२ दिवसांनंतर भेट झाली. दोघांनाही अश्रूंचा बांध फुटला आहे. रवी राणा यांनी रुग्णालयात असलेल्या नवनीत राणा यांची भेट घेतल्यानंतर नवनीत राणा यांच्या डोळ्यातून अश्रू आले. राणा दाम्पत्यांची ही भावनिक भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
खा. नवनीत राणा ‘लीलावती’ रुग्णालयात दाखल
आमदार रवी राणा हे खासदार नवनीत राणा यांना भेटण्यासाठी लीलावती रुग्णालयात येताच नवनीत राणांच्या अश्रूचा बांध फुटला. दोघेही एकमेकांच्या गळ्यात पडले. हा भावनिक प्रसंग कॅमेरात कैद झाला.
राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर खासदार नवनीत राणा यांना भायखळा तुरुंगात होत्या आणि आ. रवी राणा यांना तळोजा तुरुंगात ठेवण्यात आलं होते. बुधवारी न्यायालयाने या दोघांनाही जामीन मंजूर केल्यानंतर आज दोघांचीही सुटका झाली. खा. नवनीत राणा यांना स्पॉन्डॅलिसिसचा त्रास असल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळेच रवी राणा यांनी तुरुंगातून बाहेर पडताच लीलावती रुग्णालयात भेटण्यासाठी गेले होते .
नवनीत राणा या गेल्या सहा दिवसांपासून त्यांना स्पॉन्डॅलिसिसचा त्रास आहे अशी तक्रार करत होत्या, पण प्रशासनाने त्याची दखल घेतली नसल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला.
ही वाचा (Read This) आनंदाची बातमी! शास्त्रज्ञांनी कांद्याची एक नवीन जात केली विकसित, हेक्टरी उत्पादन 350 क्विंटल आणि लवकर खराब न होणारी !