महाराष्ट्र

कमी मार्क आले मग खचू नका, आज आहे कलेक्टर पण दहावीत होते फक्त ३५ गुण

Share Now

मार्कशीट,गुणपत्रक आणि त्यावरचे गुण हे आपल्या यश मागे किती महत्वाचे आहे? त्याचा खर्च आपल्या स्वप्नांवर किव्वा आपल्या ध्येयावर परिणाम होतो का? तर याचा उत्तर ‘नाही’ असा आहे, आज दहावीचा निकाल लागला. राज्यात २२ विध्यार्थ्यांना १०० पैकी १०० मार्क मिळाले आणि काहींना अपयश हि आला, पण अपयश आला म्हणजे खचून जाणे, किव्वा ‘माझ्या कडून होणार नाही’ असा विचार करणे योग्य नाही. १०वी मध्ये इंग्रजी मध्ये ३५ गणितात ३६ आणि विज्ञान मध्ये ३८ मार्क पडलेला IAS देखील झाला आहे. हो हे खार आहे, गुजरात येथील भरूचचे कलेक्टर तुषार सुमेरा असे त्यांचे नाव.

हेही वाचा: निकाल कमी आला ? खचुनका पहा नागराज मंजुळेंचा १० वीचा निकाल

भारतात, 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांवर अनेकदा भर दिला जातो आणि ते त्यांच्या शैक्षणिक कामगिरीचे ओळख म्हणून पाहिले जातात. मात्र आयएएस अधिकारी अवनीश शरण यांच्या केलेल्या पोस्टने ही कल्पना खोडून काढली आहे. शनिवारी, शरणने एक ट्विट पोस्ट केले ज्यामध्ये त्यांचे सहकारी आयएएस अधिकारी तुषार डी सुमेरा यांची इयत्ता 10 ची बोर्ड परीक्षेची गुणपत्रिका दर्शविली आहे, जे सध्या गुजरातमधील भरूचचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी म्हणून कार्यरत आहे.

अग्निपथ भरती योजना: 10वी उत्तीर्ण ‘अग्निवीर’ना मिळणार डायरेक्ट 12वी उत्तीर्ण प्रमाणपत्र

ट्विट मध्ये ते लिहितात, “भरुचचे जिल्हाधिकारी तुषार सुमेरा यांनी त्यांची दहावीची मार्कशीट शेअर करताना लिहिले की, त्यांना दहावीत फक्त उत्तीर्ण गुण मिळाले आहेत. त्याच्या १०० जणांना इंग्रजीत ३५, गणितात ३६ आणि विज्ञानात ३८ गुण मिळाले. संपूर्ण गावातच नाही तर त्या शाळेत ते काहीच करू शकत नाहीत असे सांगण्यात आले.”

त्या नंतर या पोस्ट वर अनेकांनी रिप्लाय, कॉमेंट केले, त्यातील एक युएस मध्ये राहणारे भारतीय अभियंता साहिल अघेर, ते लिहितात, ” मी 10वीत 47.5% गुण मिळवले आणि त्यानंतर ह्युमॅनिटीचा पाठपुरावा केला. आज मी यूएस-आधारित फर्ममध्ये काम करणारा एक मौल्यवान आयटी अभियंता आहे. इथपर्यंत पोहोचायला अजून ३ वर्षे लागली. मला वाटते की भारतात हा नियम बदलला पाहिजे की एखाद्याला कौशल्याच्या आधारावर नोकरी मिळावी, प्रमाणपत्रावर नाही.”

या संपूर्ण गोष्टीवरून हे समजते, पालकांनी विध्यार्थ्यांना कमी मार्क पडले म्हणून रागावू नाय ते त्यांचे कौशल्य ओळखावे, आणि विध्यार्थ्यानी मेहनतीने आणि जिद्द्दीने परिश्रम करून, आपले ध्येय प्राप्त करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *