काश्मीरमध्ये सुरक्षादल आणि दहशदवाद्यांमध्ये चकमक, ४ दहशदवादी ठार
दक्षिण काश्मीरमधील शोपियानमधील बडीगाम भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये अजूनही चकमक सुरू आहे. आतापर्यंत चार दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. सध्या या भागात सुरक्षा दलांची शोधमोहीम सुरू आहे. याआधी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचा इशारा दिला होता, मात्र दहशतवाद्यांनी त्याचे पालन करत गोळीबार सुरू केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोपियानच्या झैनपोरा भागाजवळील बडीगाम भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. काही वेळातच पोलीस आणि सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली. दरम्यान, एका ठिकाणी लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. यापूर्वी दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचा इशारा देण्यात आला होता, मात्र दहशतवाद्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. दोन्ही बाजूंनी अजूनही गोळीबार सुरू आहे. संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे.
आतापर्यंत किती दहशतवादी लपले आहेत याचा खुलासा करण्यात आलेला नसला तरी एका ठिकाणी सुमारे चार ते पाच दहशतवादी लपले असल्याचा अंदाज आहे. दरम्यान, सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. दुपारपर्यंत सुरक्षा दलांनी पहिल्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता, मात्र दोन तासांनंतर आणखी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. आतापर्यंत एकूण चार दहशतवादी मारले गेले आहेत. अजूनही चकमक सुरूच आहे.